AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजन साळवींनंतर आता ठाकरे गटाचे आणखी दोन बडे नेते शिंदेंच्या गळाला? गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी समोर येत आहे, राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आणखी दोन बडे नेते प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे.

राजन साळवींनंतर आता ठाकरे गटाचे आणखी दोन बडे नेते शिंदेंच्या गळाला? गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Feb 14, 2025 | 7:25 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑपरेशन टायगरबाबत बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आणखी दोन नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गोगावले?

‘ ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून येत्या मंगळवारी मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटातील दोन मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं गोगावले यांनी म्हटलं आहे’ पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, धाराशिव जिल्ह्यातल्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर आहे, ते जे करामत करतील ती करतील. मात्र माझ्या संपर्कात जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा प्रवेश येत्या 16 तारखेला होणार आहे. बरेचसे लोक शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारवर भरोसा ठेवून प्रवेश करू इच्छित आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यावर धक्के

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीचे तीन पक्ष मिळून तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते हे भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

राजन साळवी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठा फटका बसला होता. अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यात देखील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत हातात धनुष्यबाण घेतलं. महापालिका निवडणुकांपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...