VIDEO : शेतीसाहित्यासाठी निघालेल्या तरुणाला मुस्काटात, API कडून शिवीगाळ, व्हायरल व्हिडीओने संताप

जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी एका तरुणाला अशी काही कानफाडीत मारली आहे की व्हिडीओ बघताना अंगावर काटा येईल.

VIDEO : शेतीसाहित्यासाठी निघालेल्या तरुणाला मुस्काटात, API कडून शिवीगाळ, व्हायरल व्हिडीओने संताप
पोलीस अधिकाऱ्याची तरुणाला बेदम मारहाण
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 2:03 PM

परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात (Jintur corona) विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येतेय. अनावश्यक कारणांनी बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र सध्या शेतीकामाचीही लगबग सुरु आहे. त्यासाठी बी-बियाणे खरेदीसाठी गावागावात झुंबड होताना दिसत आहे. अशाच शेतीकामाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला, पोलिसांनी बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी एका तरुणाला अशी काही कानफाडीत मारली आहे की व्हिडीओ बघताना अंगावर काटा येईल. (API Arjun Pawar from Jintur Police Parbhani Maharashtra beats youth video goes viral)

जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार हे परभणी शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका तरुणाला रोखून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. हा तरुण गावातून शहराकडे शेतीचं साहित्य खरेदीसाठी आला होता. त्याला थांबवून API अर्जुन पवार यांनी मारहाण केली. मात्र शेतीकामाची कोणतीही कामं-दुकानं थांबवलेली नाहीत, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. तरीही अशी अमानुष मारहाण का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

नागरिकांकडून अर्जुन पवार यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा पद्धतीची शिवीगाळ करून मारहाण करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिंतूर शहरात वादावादी

जिंतूर शहरात लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच एका फिरत्या कापड व्यापाऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली होती. त्यालाही पोलिसांनी मारहाण केली होती. काही दिवसांपूर्वी भरचौकात पोलीस उपनिरीक्षक आणि एका किराणा दुकान व्यापाऱ्याची जोरदार वादावादी झाली होती. आता पुन्हा या व्हायरल व्हिडीओमुळे पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी आहेत की मारण्यासाठी असा प्रश्न जिंतूरकर विचारत आहेत.

वरिष्ठ पोलिसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, मारहाण झालेल्या तरुणाने API अर्जुन पवार यांना शिवीगाळ केल्याचा दावा वरिष्ठ पोलिसांनी केला आहे. त्यामुळेच रागाच्या भरात अर्जुन पवार यांनी त्या तरुणाला मारहाण केली. परंतु अशा पद्धतीने मारहाण करणे हे खेदजनकच आहे, याबद्दल आम्ही चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार आहोत, असं प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले.

VIDEO : पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या 

तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला 

(API Arjun Pawar from Jintur Police Parbhani Maharashtra beats youth video goes viral)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.