
महापालिकांच्या निवडणूका अखेर घोषीत झाल्या आहेत. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. या महापालिका निवडणूकीसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर होणार आहे. अर्जाची छाननी 31 डिसेंबरपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. आणि या निवडणूकीसाठी मतदान येत्या 15 जानेवारी 2026 होणार असून मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
या निवडणूकीत 3 कोटी 48 लाख मतदार आहेत, त्यात पुरुष मतदार 1 कोटी आणि स्त्री इतर मतदार 4 हजार 590 आहेत. 29 हजार 147 मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्रे असतील असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे.
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणूकीबाबतची घोषणा आज करण्यात आले आहे. यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत. त्यांचीही निवडणूक होणार आहे असेही आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहेत. महापालिकेसाठी एक मत द्यावे लागेल. 28 महापालिका या मात्र बहुसदस्यीय आहेत. बहुतेक ठिकाणी चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. काही प्रभागात तीन तर काही ठिकाणी पाच उमेदवार असणार आहेत. या २८ महापालिकेत मतदारांना तीन ते पाच मते द्यावी लागणार आहेत.
महापालिकेच्या निवडणूकीसाठी नामर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हे ऑफलाईन घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा लागले. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचे हमी पत्र द्यावे लागेल. नाही दिले तर निवड रद्द होईल असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.