AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य, न्यायालयाचा निर्णय

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मोठा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. (kanhuraj bagate saibaba sansthan)

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य, न्यायालयाचा निर्णय
कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मोठा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.
| Updated on: Mar 20, 2021 | 1:40 AM
Share

अहमदनगर : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे ( Kanhuraj Bagate) यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मोठा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केली होती. (appointment of Kanhuraj Bagate as chief executive officer of Saibaba Sansthan is illegal)

बगाटेंची नेमणूक नियमबाह्य

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीच्या विरोधात शिर्डी येथील उत्तम शेळके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. न्यायालयाने कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे सागंत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बगाटे हे आयएएस ऑफिसर नसूनसुद्धा राज्य सरकारने त्यांनी शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती दिली होती.

विनामास्क आढळल्यास 1000 रुपयांचा दंड

राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शिर्डी ग्रामपंचायतीने तीन आठवड्यांपूर्वी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता शिर्डीत कोणताही नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्याला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून पाच हजारांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.

दरम्यान, कान्हूराज बगाटे यांनी निवड ही नियमबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे बगाटे अडचणीत सापडले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बगाटे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नेमणूक होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update | कोरोनाचा विस्फोट सुरुच, महाराष्ट्रात आज 25,681 नवे रुग्ण, 70 रुग्णांचा मृत्यू

दररोज 1 लाख लोकांना लस, 45 लाखाचं टार्गेट, मुंबई आयुक्तांचा मास्टर प्लॅन

Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना

(appointment of Kanhuraj Bagate as chief executive officer of Saibaba Sansthan is illegal)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.