Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. (Maharashtra Covid-19 New Guidelines)

Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना
Lockdown
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 3:26 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. (Maharashtra Covid-19 New Guidelines)

राज्यात कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत काही नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

राज्यातील कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स कोणत्या?

राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवा, असे आदेश देण्यात आला आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

त्याशिवाय नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  (Maharashtra Covid-19 New Guidelines)

राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा
  • नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी
  • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
  • सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही

दिवसभरात 25 हजार 833 नवे रुग्ण

राज्यात काल दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय?

Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.