AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोशी झालेल्या भांडणामुळे पोलिसांची धावपळ, बीडीडीएसचे पथक विमानतळावर

भांडण दोघांमध्ये होते. परंतु त्रास मात्र यंत्रणेला होतो. दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिली गेली होती. आता बायकोशी भांडण झाल्याने विमानतळ उडवण्याची धमकी आली आहे. यामुळे पोलिसांची धावपळ उडली.

बायकोशी झालेल्या भांडणामुळे पोलिसांची धावपळ, बीडीडीएसचे पथक विमानतळावर
airport security
| Updated on: Apr 14, 2023 | 9:18 AM
Share

दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उडवून देणार’ असा धमकीचा कॉल दोन दिवसांपूर्वी आल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. तपासाची सूत्र वेगाने हलवण्यात आली होती. मग काही तासांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. राजेश मारूती आगवणे असं या आरोपीचं नाव आहे. या व्यक्तीने कौटुंबिक वादातून मुख्यमंत्र्यांना धमकी दिली होती, असे तपासात स्पष्ट झाले होते. आता बायोकोशी भांडण झाल्याच्या वादातून विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

काय आहे प्रकार

आधी कौटुंबिक वादातून मुख्यमंत्र्यांना धमकी दिली गेली होती. आता बायकोशी भांडण झाल्याने विमानतळ उडवण्याची धमकी आली आहे. मांगिरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा छत्रपती संभाजीनगरचे विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला या फोनमुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली.

पथकाने केली तपासणी

महाराष्ट्र पोलिसांचे बीडीडीएस पथक हे व्हीव्हीआयपी, व्हीआयपी दौरे यांची सुरक्षा अन् सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी संशयीत व बाँब सदृश्य भागाची तपासणी करते. हे पथकही संभाजीनगर विमानतळावर आले. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर फोन लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्याने बायको सोबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्याचे सांगितले. कारभारी कडुबा रिठे असे फोन करणाऱ्याचे नाव आहे. तो रिक्षाचालक असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी डोक्याला हात लावला. कारण बायको अन् नवऱ्याचे झालेले भांडण पोलिसांच्या धावपळीला कारणीभूत ठरले.

त्याने तर दिली मुख्यमंत्र्यांना धमकी

११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली होती. धमकी देणाऱ्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी राजेश मारुती आगवणे याने कौटुंबिक वादानंतर मद्यप्राशन करून सदर कॉल केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आरोपीची बायको पुण्यात धायरी येथे वास्तव्यास आहे. तर पुण्यातील वारजे येथून आरोपीने धमकी देणारा फोन केला. 112 नंबरला सोमवारी रात्री ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे..’ असे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. वारजे येथून आरोपीचे लोकेशन मिळाले. सदर आरोपी मारुती आगवणे हा शास्त्री नगर धारावी येथील रहिवासी असल्याची माहितीदेखील पोलीस तपासात उघड झाली आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.