Nashik| साहित्य संमेलनासाठी 7000 जणांची बैठक व्यवस्था तयार; पावसामुळे कार्यक्रम स्थळांचे फेरनियोजन

साहित्य संमेलन कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. मुख्य मंडपात 7000 जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Nashik| साहित्य संमेलनासाठी 7000 जणांची बैठक व्यवस्था तयार; पावसामुळे कार्यक्रम स्थळांचे फेरनियोजन
साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचे काम पूर्ण झाले आहे.

नाशिकः कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आहे. या साहित्य संमेलन कार्यक्रमास पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. मुख्य मंडपात 7000 जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, तर पावसामुळे काही कार्यक्रम स्थळांचे फेरनियोजन करण्यात आले आहे.

असे आहे फेरनियोजन

पाऊस जरी सुरू झाला असला तरी आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे. पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमात कुठलेही बदल केले जाणार नाहीत. मुख्यमंडप हा पावसापासून पूर्ण संरक्षण होईल या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कुठलीही अडचण होणार नाही. केवळ जे कार्यक्रम आपण खुल्या व्यासपीठावर घेणार होतो ते कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. त्यात बालसाहित्य मेळावा हा आता मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या जागेत होणार आहे. कवी कट्टा कॉलेज कँटीन जागेत, तर गझल कट्टा सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. याठिकाणी पहिल्यापेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

15 मिनिटांनी सिटीबस

कार्यक्रम स्थळी जास्तीत जास्त नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास मंडपाच्या दोन्ही बाजूने चर खोदून पाणी जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. साहित्य संमेलन सर्व नाशिककरांचे असून सर्वांना मोफत प्रवेश आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील सर्व भागातून साहित्य संमेलनाच्या स्थळापर्यंत म्हणजेच आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीपर्यंत दर पंधरा मिनिटाला एक अशा सिटीबसची सोय करण्यात आली आहे.

भुजबळांचे लक्ष

साहित्य संमेलनाच्या तयारीत आता स्वतः पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी लक्ष घातले आहे. नाशिकमध्ये काल जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आढावा घेतला. आताही प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. नाशिकचे साहित्य संमेलन यादगार करू, असा चंग त्यांनी बांधला आहे.

इतर बातम्याः

Nashik| मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख कौतुकास्पद, भुजबळांचे गौरवोद्गार; खेलो इंडिया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन

एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश

दगाबाज पावसाचा अवकाळी घाव, नाशिकचा शेतकरी हवालदिल; द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरीला बसणार फटका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI