दिल्लीला जाणारच! अटक करायची असेल तर करा; अभिजीत दिपकेंचं सरकारला खुलं आव्हान, म्हणाले- डरपोक सरकार…

Abhijeet Dipke News: तरुणांची एवढी भीती वाटते तर देशच बंद करा, असं म्हणत अभिजीत दिपकेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दिल्लीला जाणारच! अटक करायची असेल तर करा; अभिजीत दिपकेंचं सरकारला खुलं आव्हान, म्हणाले- डरपोक सरकार...
| Updated on: Oct 09, 2026 | 6:31 PM

दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या एका निर्णयामुळे हजारो प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. तसेच अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. यावर आता अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत दिपके म्हणाले की, हा देश भाजपचा झालेला आहे. देशातील सर्व संस्था भाजपच्या झाल्या आहेत. यामुळे ते कुणाचे ऐकायला तयार नाहीत. तुम्ही रेल्वे मेट्रो सेवा कशी बंद करू शकता? आता ते लोक विमानांच्या प्रवाशांची यादी मागत आहेत. सरकार देशातील तरुणांना घाबरलेलं आहे. हे डरपोक सरकार आहे. मला अटक करा, मला अटक केल्याने देशाच्या अडचणी दूर होणार असतील तर मला अटक करा. मी दिल्लीला जाणार आहे. जर मला अटक करायचे असेल तर करा. तरुणांची एवढी भीती वाटते तर देश बंद करा, असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Loading...

ते पुढे म्हणाले की, मी दिल्लीला जाणार आहे. मला अटक करायची तर करा. मी इथेच आहे मुंबईत किंवा दिल्लीत. अटक करायची असेल तर करा. देशाच्या तानाशाहांना सांगा का असे करत आहात? नरेंद्र मोदींच्या डोक्यात तानाशाही घुसली आहे. हे सरकार घाबरलेले आहे.

यावर सौरभ दास म्हणाले की, दिल्लीत 40 हजार पोलीस आले आहेत. दिल्ली पूर्ण बंद केली आहे. आमच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. देशात आणीबाणी होती तसे दिसत आहे. जेनझीचे नाव मतदान याद्यांवर नाही आहे. आम्ही त्यासाठी शांततेत आंदोलन करत आहोत. लोकांचे ऐकले जाते तेव्हाच ते लोकतंत्र असते. सुप्रीम कोर्ट बोलायचे तेव्हा मंत्री राजीनामा द्यायचे. आता युवकांच्या अधिकारांचे हनन होत आहे. आम्ही शांतेत आंदोलन करणार आहोत. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोवर आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्राची सरकारही घाबरलेली आहे. आम्ही दिल्लीत जाणारच, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us