अरुण राठोडचं कुटुंब चार दिवसानंतर घरी, पण अरुण अद्याप गायब; घरात झाली लाखो रुपयांची चोरी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. (arun rathod family returned in home after four days at beed)

अरुण राठोडचं कुटुंब चार दिवसानंतर घरी, पण अरुण अद्याप गायब; घरात झाली लाखो रुपयांची चोरी
ICICI गृह कर्जांकडून 30 लाखांचे कर्ज घेतल्यास तुम्हाला दरमहा 22,900 रुपये ईएमआय 6.80% दराने भरावे लागेल.


बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. (arun rathod family returned in home after four days at beed)

पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव आल्यानंतर अरुण आणि त्यांचं कुटुंब बेपत्ता झालं होतं. त्याच्या घराला गेल्या चार दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, चार दिवसानंतर अरुणचे कुटुंबीय गावात आले आहेत. मात्र, अरुण अजूनही बेपत्ता आहे. तो कुटुंबासोबत आलेला नाही. त्यामुळे अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल केला जात आहे.

घरात लाखोंची चोरी

अरुणचं कुटुंब घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.

तो आवाज अरुणचा नाही, त्याला गोवलं जातयं

अरुण राठोडच्या कुटुंबीयांनी गावात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऑडिओ कॉलमधील आवाज अरुणचा नाही. अरुणला या प्रकरणात गोवलं जात आहे. तो निर्दोष आहे, अशी प्रतिक्रिया अरुणची आई मीराबाई राठोड यांनी व्यक्त केली आहे.

दोन दिवसात माध्यमांसमोर येईल

अरुणचं कुटुंब गावात आलं असलं तरी अरुण मात्र अद्याप आलेला नाही. अरुण दोन दिवसात माध्यमांसमोर येईल, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र, अरुण नेमका कुठं आहे? कुणासोबत आहे? तो समोर का येत नाही? असा सवाल करण्यात आला असता त्यांच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला.

कसं आहे अरुणचं गाव?

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या टीमने थेट त्याचं गावच गाठलं. त्याच्या गावात जाऊन आधी त्याच्या घराला भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या घराला कुलूप होती. अरुण घरी नव्हता आणि त्याचं कुटुंबही गावात नव्हतं. गावातील लोकांनाही त्याचं कुटुंब कुठं गेलं याची माहिती नाही. कोणीही काही सांगायला तयार नाही. त्यामुळे राठोड कुटुंब गेलं कुठं? असा सवाल केला जात आहे. आमची टीम धारावती तांड्याला पोहोचली. हे गाव अत्यंत छोटंसं दिसलं. पण गावात वर्दळ मोठी होती. आम्ही संत सेवालाल चौकात पोहोचलो. इथं गौर सेनेचा बोर्ड लावलेला होता. गावचे रस्ते कच्चे होते. एकही सिमेंटचा रस्ता दिसला नाही. चौकाच्या बाजूला किराणाचं दुकान होतं. दुकानाभोवती उघडी नागडी लहान पोरं खेळत होती. आम्ही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर गावात काही गाड्या दिसल्या. रस्त्याच्या दुतर्फा मातीची घरं दिसली. गावात माणसांची वर्दळ दिसत होती. शेळ्या मेंढ्यांचे आवाज आणि कूत्र्यांची ये जाही सुरू होती. गावात काहीच घडलं नाही, अशीच परिस्थिती जाणवत होती.

कसं आहे अरुणचं घर?

अरुणचं घर पक्कं आणि स्लॅबचं आहे. घरावर बालाजी कृपा असं लिहिलेलं आहे. बाजूलाच ओम असंही लिहिलेलं असून भिंतीवर हिरव्या रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. घराला पिवळसर रंग दिलेला आहे. घराच्यावर मधोमध राठोड निवास 2010 लिहिलेलं आहे. घरासमोर मोठं अंगण असून अंगणात मधोमध झाड लावलं आहे. घराच्या चोहोबाजूला सिमेंटच्या भिंतींचं कुंपन असून मोठा लोखंडी गेटही लावलेला आहे. गेटच्या बाहेरही एक मोठं झाड आहे. साधारणपणे बघातच क्षणी अरुणचं कुटुंब सधन असल्याचं दिसून येतं.

अरुण मूळचा धारावती तांड्याचा नाही

अरुण हा मूळचा दारावती तांड्याचा नाही. काही वर्षापूर्वी राठोड कुटुंब येथे येऊन थांबले. ते मूळचे कोठडा येथील आहे. अरुण पदवीधर आहे. गावातील शिकलेल्या तरुणांपैकी तो एक आहे. तो मितभाषी असल्याचंही गावकरी सांगतात.

संबंधित बातम्या:

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; अनिल देशमुख यांचं मोठं विधान

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI