संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; अनिल देशमुख यांचं मोठं विधान

वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (home minister anil deshmukh reaction on pooja chavan suicide case)

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; अनिल देशमुख यांचं मोठं विधान

नागपूर: पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (home minister anil deshmukh reaction on pooja chavan suicide case)

अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

राठोडांचा निर्णय अहवाल आल्यावर

पूजा चव्हाण प्रकरणी राठोडा यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत, असं देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल.

सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचा विपर्यास

यावेळी देशमुख यांनी त्यांनी सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगितलं. मी सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिलेच नव्हते. तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या आयटी सेलमधून कशा प्रकारचे ट्विट केले गेले याची चौकशी करण्याचे हे आदेश होते, असं त्यांनी सांगितलं. लता मंगेशकर या दैवत आहेत. तर सचिन तेंडुकरला देशातील प्रत्येक व्यक्ती मानतो. त्यामुळे त्यांच्या ट्विटच्या चौकशीचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काय आहे आत्महत्या प्रकरण?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढं आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत. (home minister anil deshmukh reaction on pooja chavan suicide case)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे म्हणतात…

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

(home minister anil deshmukh reaction on pooja chavan suicide case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI