AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमध्ये धुसफूस, शिंदेंच्या मंत्र्याने सभेतच सगळं बाहेर काढलं, थेट बैठक बोलवणार; नेमकं काय घडतंय?

2024 ला सरकार निवडून आल्यापासून आजपर्यंत जितका निधी वाटप करण्यात आला त्याची यादी काढा आणि निधी वाटपामध्ये आपल्यावर कशा प्रकारचा अन्याय झाला याची तंतोतंत आकडेवारी काढा, अशा देखील सूचना मंत्री आशिष जयस्वाल यांनी शिवसैनिकांना दिल्या.

महायुतीमध्ये धुसफूस, शिंदेंच्या मंत्र्याने सभेतच सगळं बाहेर काढलं, थेट बैठक बोलवणार; नेमकं काय घडतंय?
eknath shinde and devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 6:31 PM
Share

Ashish Jayaswal : महायुतीमधील तिन्ही घटकपक्ष एकदिलाने काम करत आहेत, असे वरिष्ठ नेतृत्त्वाकडून नेहमी सांगितले जाते. परंतु स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाचे नेते, आमदार वेगवेगळ्या कारणामुळे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळते. अनेकदा महायुतीमधील घटकपक्षतील नेत्यांनी एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, आता महायुतीमधील धुसफूस आता पुन्हा एकदा समोर आली आहे. जालना जिल्ह्यात निधीवाटपावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री आशिच जयस्वाल यांनी निधी वाटपावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत जालन्याच्या पालकमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे, असेही त्यांनी सांगितले.

जालन्याच्या पालकमंत्र्यांना आपण पत्र लिहिलं असून..

जालन्यात आज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांनी निधी वाटपाबाबत केलेल्या तक्रारीनंतर स्वतः मंत्री आशिष जयस्वाल यांनी या संदर्भात खंत व्यक्त केली. जालन्यात शिवसैनिकांच्या बाबतीत निधीमध्ये असमतोल आणि शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचं मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. जालन्याच्या पालकमंत्र्यांना आपण पत्र लिहिलं असून आचारसंहिता संपल्यानंतर बैठक लावून महायुतीच्या समन्वय समितीमध्ये निधी वाटपाबाबत जे सूत्र ठरलं तेच स्थान आपलं राहणार असून तो बॅकलॉग भरल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही अशी भूमिका मंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतली.

शिवसेनेच्या समर्थनशिवाय राज्यात एकही आमदार…

दरम्यान 2024 ला सरकार निवडून आल्यापासून आजपर्यंत जितका निधी वाटप करण्यात आला त्याची यादी काढा आणि निधी वाटपामध्ये आपल्यावर कशा प्रकारचा अन्याय झाला याची तंतोतंत आकडेवारी काढा, अशा देखील सूचना मंत्री आशिष जयस्वाल यांनी शिवसैनिकांना दिल्या. शिवसैनिकांच्या समर्थनाशिवाय महाराष्ट्राच्या विधानसभेत एकही आमदार निवडून येऊ शकत नाही, अशी ताकद निर्माण करा. तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही असा सल्लाही मंत्री आशिष जयस्वाल यांनी कार्यकर्त्यांना दिला. आता जयस्वाल यांनी खंत व्यक्त केल्यानंतर महायुतीमध्ये नेमका काय निर्णय होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार