AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळाकुट्ट अंधार, रिमोट कंट्रोलचा साप अन्… भोंदू बाबा अशोक खरात मध्यरात्री जे करायचा ते पाहून..

नाशिकमधील अशोक खरातने रिमोट कंट्रोल सापाचा वापर करून अवतार पूजेच्या नावाखाली भाविकांना लुटल्याचा प्रकार समोर आला असून, राजेंद्र जासूदानींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळाकुट्ट अंधार, रिमोट कंट्रोलचा साप अन्... भोंदू बाबा अशोक खरात मध्यरात्री जे करायचा ते पाहून..
Ashok Kharat
| Updated on: Mar 26, 2026 | 12:00 PM
Share

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरातची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या विरुद्ध आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. आता भोंदू बाबा अशोक खरात भाविकांची कशाप्रकारे फसवणूक करायचा याची माहिती समोर आली आहे. नागदेवता प्रसन्न होईल, पण हातातले तांदूळ सांडले तर तो तुम्हाला दंश करेल अशी भयंकर भीती दाखवून अशोक खरात भाविकांची आर्थिक लूट करायचा. अशोक खरातच्या भोंदूगिरीचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाला आहे. रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या नकली सापाचा वापर करून रात्रीच्या अंधारात भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या अशोक खरातवर आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र जासूदानी यांच्या तक्रारीत काय?

अशोक खरातविरुद्ध राजेंद्र जासूदानी यांनी एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, अशोक खरात हा भाविकांना नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी घेऊन जात असे. तिथे अवतार पूजा करण्याचे नाटक करून तो भक्तांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण करायचा. मी आता पूजा करतोय, थोड्याच वेळात साक्षात नागदेवता प्रकट होईल. तुमच्या हातातील तांदूळ खाली पडू देऊ नका, अन्यथा नागदेव तुम्हाला चावेल, असे सांगून तो भक्तांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवत असे.

यानंतर भक्त घाबरलेल्या अवस्थेत असताना खरात काही मंत्रांचे उच्चार केल्याचे सोंग करायचा. त्याचवेळी तो अंधारात रिमोट कंट्रोलवर चालणारा नकली साप समोर आणायचा. रात्रीचा गडद अंधार असल्यामुळे समोर सरपटणारा साप नकली आहे, हे भक्तांच्या लक्षात येत नसे. सापाची हालचाल पाहून घाबरलेले भक्त जागेवरून हलत नसत आणि खरात सांगेल त्याप्रमाणे वागत असत. ही भीती घालवून नागदेवतेला शांत करण्यासाठी खरात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचा, अशी माहिती जासूदानी यांनी दिली आहे.

खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष

या प्रकरणातील तक्रारदार राजेंद्र जासूदानी यांच्यावर गेल्या वर्षी अशोक खरातने स्वतःच खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, जासूदानी यांना खरातच्या वागणुकीवर संशय होता. त्यांनी खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. त्यानंतर आता अखेर जासूदानी यांनी खरात कशाप्रकारे फसवणूक करायचा, तो कशाप्रकारे लोकांना लुबाडण्याचे काम करायचा, याबद्दलची माहिती दिली आहे. जासूदानी यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे याचा तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी