AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरातच्या बँकेत सापडले घबाड, FD सोबत तब्बल इतकी मालमत्ता; आकडा पाहून विस्फारतील डोळे!

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा झाला आहे. २०२४ मध्ये ७६ लाखांच्या देणग्या मिळाल्याचे ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या बँकेत सापडले घबाड, FD सोबत तब्बल इतकी मालमत्ता; आकडा पाहून विस्फारतील डोळे!
Ashok Kharat
| Updated on: Mar 24, 2026 | 10:16 AM
Share

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे अनेक काळे कारनामे सतत समोर येत आहेत. आता खरात फाईल्समध्ये एक मोठी आर्थिक अपडेट समोर आली आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या ऑडिट रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संस्थानाची मालमत्ता अवघ्या काही वर्षांत कोटींच्या घरात कशी पोहोचली, याचा खुलासा समोर आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनाही हादरा बसला आहे.

२०२४ ठरलं गेम चेंजर वर्ष

मिळालेल्या माहितीनुसार, २०२० ते २०२२ या काळात संस्थानची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. या दोन वर्षांत संस्थानचे उत्पन्न केवळ ४.९० लाखांच्या घरात होते. उलट या संस्थानांमध्ये १.६० ते १.६४ लाखांची तूट नोंदवण्यात आली होती. मात्र २०२४ हे वर्ष या संस्थानसाठी आर्थिक चमत्कार ठरले आहे. या एकाच वर्षात संस्थानवर तब्बल ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव झाला आहे. सर्व खर्च वजा करुनही या संस्थानकडे ७०.६६ लाखांची विक्रमी शिल्लक उरली.

मालमत्तेत भरमसाठ वाढ

ऑडिट रिपोर्टनुसार, या संस्थानची मालमत्ता ज्या वेगाने वाढली आहे, त्यामुळे या तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले आहेत. २०२२ मध्ये या संस्थानांची मालमत्ता ९६ लाख रुपये इतकी होती. त्यानंतर २०२५ पर्यंत या संस्थानाची मालमत्ता १ कोटी ८१ लाख इतकी झाली आहे. तसेच या संस्थेच्या नावे बँकेत २३ लाख ३५ हजार रुपयांच्या मुदत ठेवी (FD) आढळून आल्या आहेत.

आता या शिवनिका संस्थांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात देणग्यांचा महापूर नेमका आला कुठून? हा पैसा भाविकांच्या लुटीचा आहे की यामागे काही काळेबेरे आहे? याचा छडा आता नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

तक्रारदारांचा आकडा वाढला; खरात आज न्यायालयात

दरम्यान अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासादरम्यान खरात विरोधात तक्रार करणाऱ्या पीडितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि विनयभंगाचे एकूण ६ गुन्हे दाखल झाले आहेत. दैवी शक्तीचे आमिष दाखवून महिलांचे शारीरिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, एसआयटी आता त्याच्या मालमत्तेच्या आणि बँक व्यवहारांच्या मुळाशी जात आहे.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल