AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा गुरूही भोंदूच निघाला, नेहमी भेटायचा, काय काय द्यायचा? या शहराशी कनेक्शन

नाशिकच्या सिन्नरमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातच्या पापांचा घडा भरला असून, त्याच्यावर ७ गुन्हे दाखल झाले आहेत. मूळ नाव लक्ष्मण असून, तो १०वी नापास असल्याचे उघड झाले. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून, त्याची इगतपुरी कनेक्शन आणि 'भोंदू' गुरूची माहिती समोर आली आहे. SIT या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहे, ज्यात खरातला गंडे-दोरे पुरवणाऱ्या 'गुरू'ची चौकशी सुरू आहे.

Ashok Kharat Case :  भोंदूबाबा अशोक खरातचा गुरूही भोंदूच निघाला, नेहमी भेटायचा, काय काय द्यायचा? या शहराशी कनेक्शन
भोंदूबाबा अशोक खरात
| Updated on: Mar 25, 2026 | 10:50 AM
Share

नाशिकच्या सिन्नरधील स्वयंघोषित कॅप्टन, अंकशास्त्रज्ञ, अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापांचा घडा भरला असून पोलीस कोठडीत सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरात प्रकरणात निवेदन देत त्याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला. तसेच त्याची संपत्ती, अचानक झालेली वाढ याबद्दलही माहिती समोर आली आहे. एकीकडे अनेक पीडित महिला पुढे येऊन खरातच्या दृष्कृत्यांनाबद्दल सांगताना तदिसत आहेत तर दुसरीकडे त्याने आणखीही गैरप्रकार, फसवणूक केल्याचेही उघड झाले आहेत.

10वीत नापास , गणितात उडाली दांडी 

त्याचं मूळ नावही अशोक नसून लक्ष्मण असं होतं. तर स्वत:ला अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा हा भामटा 10वीत चक्क नापास झाल होता, असंही आता उघड झालं. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा खरातची गणितातच दांडी उडाली. तसंच शाळेच्या नोंदीत त्याचं मूळ नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असं होतं, पण नंतर त्याने नाव बदलून ‘अशोककुमार’ केल्याची शक्यता आहे, अशीही माहिती उघड झाली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातचा गुरू कोण ?

खरातच्या कार्यालयात, त्याला भेटायला अनेक राजकारणी, नेते, बडे अधिकारी, सेलिब्रिटी यायचे. तो भविष्य सांगायचा, अनेकांचा गुरु होता असं म्हटलं जातं. याच खरातबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक मोठी लोकं त्याच्याकडे सल्ला मागायला जायची, पण इतरांना सल्ला देणारा हा खरात सल्ल्यासाठी कोणाकडे जायचा, त्याचा गुरू कोण होता? याची माहिती आता समोर आली आहे.

खरातचं इगतपुरी कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या अनुषंगाने आता पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, SITने मंगळवारी इगतपुरी तालुक्यात धाड टाकून कसून चौकशी सुरू केली .

अशोक खरात हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील एका भोंदूबाबाच्या घरी नियमित येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता या माहितीच्या आधारे एसआयटीचं पथक हे गावी सर्वांगीण चौकशी करू शकतं. तेथील एका भोंदूबाबाकडून अशोक खरातला गंडे दोरे, अंगठ्या वगैरे पुरवल्या जात असाव्या , असा अंदाज वर्तवला जातोय. आणि त्याच वस्तूंचा गैरवापर करून खरात हा अनेक लोकांना, महिलांनाही जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा असं दिसत आहे.

खरातची कोट्यवधींची संपत्ती

काल मुख्यमंत्री फडणवीसांनी याप्रकरणी निवेदन दिलं, तेव्हा त्यांनी खरातची कुंडली बाहेर काढली. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती ? त्याचा सीए कोण हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोपीची कुठे प्रॉपर्टी आहे त्याची माहिती त्यांनी दिली. मिरगाव येथे ३३ एकर, पाथर्डी गाव १० एकर, नाशिक सिन्नर १० एकर, राहता अहिल्यानगर साडेचार एकर, काकडी तालुका शिर्डा विमानतळ ५.५ एकरट, पाथर्डी फाटा फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक पाच गुंठ्याचा प्लॉट, पनवेल ४० गुंठे प्लॉट, कॅनडा कोर्ट नाशिक ऑफिस १८० स्क्वेअर फूट, संगमनेर मुलीच्या नावावर ८० गुंठे प्लॉट, पुणे मुलीच्या नावावर प्लॉट, असल्याचं नमूद केलं.

तसेच नाशिक कर्मयोगी नगर बंगला, शिर्डी तालुका राहता साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय, सिन्नर पाच जणात सहा एकर जमीन, मिरगाव फार्महाऊस, स्वत:कडे १२ तोळे सोने, पत्नीकडे २० तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक, पाच बँक खाते असून एकूण 40 कोटी 87 लाखाचे बाजारमूल्य असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?