AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन खरात नव्हे तर हा खरा मास्टरमाईंड, लैंगिक शोषणाचे 100…. एका फोटोमुळे राज्यात खळबळ!

भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्याने केलेल्या शोषणाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. आता या प्रकरणात सामील असलेल्या ऑफिस बॉयचा फोटो समोर आला आहे.

कॅप्टन खरात नव्हे तर हा खरा मास्टरमाईंड, लैंगिक शोषणाचे 100.... एका फोटोमुळे राज्यात खळबळ!
ashok kharat and niraj jadhavImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 6:39 PM
Share

भोंदुबाबाब अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या भोंदुबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या कृत्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या भोंदुबाबाचे सत्ताधारी पक्षांतील अनेक नेत्यांसोबत फोटो असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर अखात याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. असे असतानाच आता याच शोषण कांडामध्ये हादरवून टाकणारा नवा चेहरा समोर आला आहे. या प्रकरणातील नीरज जाधवचा चेहरा समोर आला आहे.

नीरज जाधव कोण आहे?

कॅप्टन फाईल्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून नीरज जाधव कोण होता, असे विचारले जात होते. या नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याचा फोटो शेवटी समोर आला आहे. नीरज जाधवचा खरा चेहरा समोर आला आहे. हा नीरज जाधव कॅप्टन अशोक खरात याच्या कार्यालयात होता. तो तिथे ऑफिस बॉय म्हणून कार्यरत होता. खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यावेळी हाच नीरज जाधव व्हिडीओ रेकॉर्ड करायचा, असा आरोप केला जातोय. त्याने 100 पेक्षा अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा केला जातोय. त्याचाच फोटो आता समोर आला आहे.

नीरज जाधवमुळे काय काय गौप्यस्फोट होणार?

नीरज जाधव हा अशोक खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. पोलिसांनी संशय बळावल्यामुळे नीरज जाधवलाही अटक केले आहे. त्याच्याकडेच अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ सापडलेले आहेत. त्याला ताब्यात घेतल्याने आता अनेक मोठ्या गोष्टींचा खळबळजनक खुलासा होण्याची शक्यता आहे.

आणखी एक व्हिडीओ समोर

दरम्यान, दुसरीकडे अशोक खरात हादेखील पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचीही कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तो या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलीच्या पोटावर काहीतरी लावत असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या समोर एक महिला बसलेली आहे. खरातचे हे व्हिडीओ समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी