AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : महाराष्ट्र हादरवणारी बातमी… लिंगपिसाट खरातच्या विशेष भक्त परिवारात आमदाराची बायको? धक्कादायक खुलासा काय?

अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर SIT तपास करत आहे. आता धक्कादायक खुलासा झाला आहे की, त्याच्या 'विशेष भक्त परिवारात' एका आमदाराच्या पत्नीचा समावेश आहे. नाशिकमधील त्याच्या कार्यालयात ती जात असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

Ashok Kharat : महाराष्ट्र हादरवणारी बातमी... लिंगपिसाट खरातच्या विशेष भक्त परिवारात आमदाराची बायको? धक्कादायक खुलासा काय?
Ashok Kharat
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 11:07 AM
Share

स्वंयघोषित कॅप्टन, ज्योतिषी, भविष्य सांगण्याचा दावा करणारा अशोक खरातच्या कारनाम्यांनी अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अनेक महिलांचे लैंगिक षोण केल्याचा, त्याचं रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यवर आहे, एवढंच नव्हे तर त्याने भोंदूगिरी करत अनेकांची फसवणूक केल्याचे, कोट्यावधींची मालमत्ता जमवल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणात गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली असून एसआयटीकडून याचा सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत असून आता पुढे आलेल्या एका तपशीलामुळे महाराष्ट्र हादरला आहे.

 विशेष भक्त परिवारात आमदाराची बायको ?

भोंदू अशोक खरात याचे कारनामे, संपत्तीचा तपशील याबाबत कसून माहिती गोळा केली जात आहे. याचदरम्यान नवी अपडेट समोर येताना दिसत आहे. अशोक खरातच्या ‘विशेष भक्त परिवारात’ एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा आहे. अनेक राजकीय नेते, मंत्री, राजकारणी हे भोंदू बाबाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी जात होते. याचाच एक भाग म्हणून एका आमदाराची पत्नी आहे, तिचं नाव समोर येत आहे. ती सातत्याने या भोंदूबाबाच्या संपर्कात होती. नाशिकमधील त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कार्यालयात ती जात होती अशी माहिती समोर आली आहे.

एवढंच नव्हे तर खरात याच्या इशान्येश्वर मंदिरात देखील तिने विधी केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणात अधिकृतरीत्या कोणतंही नाव जाहीर झालेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचाही सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणा भोवतीचे गूढ आणखी गडद झाल्याचं दिसत असून या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबांपर्यंत जाळे पसरल्याचे संकेत मिळत आहेत.

खरात प्रकरणात नवा धागा समोर, दशक्रिया पत्रिका चर्चेत 

दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धागा समोर आला असून खरात कुटुंबातील दशक्रिया पत्रिका चर्चेत आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा आता राजकीय वर्तुळाकडे वळू शकते. 2017 सालातील अशोक खरातच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये शोकाकुलांच्या यादीत माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असून  पत्रिका समोर आल्यानंतर खरात-चाकणकर संबंधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दोघांतील संभाव्य निकट संबंधांवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रकरणाला नवे राजकीय परिमाण मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?