मुंबई मेट्रोचा खर्च का वाढला? मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगीतले कारण

ज्यावेळी प्रोजेक्ट डीपिआर झाला तेव्हा याची किंमत 23 हजार कोटी होती. त्यानंतर आता पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. दिल्लीच्या बेस वर हा प्रोजेक्ट करण्यात येत होता. त्यामुळे त्यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट तयार करण्यात आले होते. दिल्ली आणि मुंबई मध्ये अनेक फरक दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे कामाची किंमत वाढली. आता पर्यंत 21 हजार 520 कोटी आता पर्यंत खर्च झाले असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगीतले.

मुंबई मेट्रोचा खर्च का वाढला? मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगीतले कारण
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 4:25 PM

मुंबई : राज्यात नवे शिंदे फडणवीस सरकार स्थापन होतात मेट्रोच्या कामाला गती आली आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ(Colaba- Bandra- Seepz) या मुंबई मेट्रो मार्ग-3(Metro 3) प्रकल्पाचा खर्च 33 हजार कोटींवर गेला आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी बुधावरी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत या वाढीव खर्चाला मंजूरी दिली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मेट्रोचा खर्च नेमका कशामुळे वाढला याबद्दल मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे(Ashwini Bhide, Managing Director of Metro) यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या अश्विनी भिडे

ज्यावेळी प्रोजेक्ट डीपिआर झाला तेव्हा याची किंमत 23 हजार कोटी होती. त्यानंतर आता पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. दिल्लीच्या बेस वर हा प्रोजेक्ट करण्यात येत होता. त्यामुळे त्यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट तयार करण्यात आले होते. दिल्ली आणि मुंबई मध्ये अनेक फरक दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे कामाची किंमत वाढली. आता पर्यंत 21 हजार 520 कोटी आता पर्यंत खर्च झाले असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगीतले. बुधवारी महाराष्ट्र सरकारने या वाडीव खर्चास मंजुरी दिली आता वाढीव खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असे भिडे म्हणाल्या.

2015 साली मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत होती 23 हजार कोटी

2015 साली मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत होती 23 हजार कोटी होती. मात्र, कोरोना काळात मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला. जवळपास अडीच वर्षे हे काम बंद असल्यासारखंच होतं. त्यामुळे या प्रोजेक्टचे काम लांबणीवर पडले आहे. या प्रकल्पाचा पहिला फेज 2021 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. तर 2022 साली प्रकल्प पुर्ण करायचा होता. कारशेडवरच्या स्थगितीमुळे प्रकल्प आणखी लांबणीवर पडला. त्यातच मधल्या काळात कच्च्या मालाचा खर्च वाढल्याने 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता ढोबळमानाने 33 हजार कोटी रुपयांचा झाला आहे.

मेट्रोच्या कामाची सध्याची स्थिती

मेट्रोचे स्थापत्य कामं 85 टक्के पूर्ण झाले आहे. इतर सगळी कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. पण कारडेपोचं काम केवळ 29 टक्केच पूर्ण झालं आहे. त्यामुळे हे काम आता वेगानं करुन याचा पहिला फेज कुठल्याही परिस्थितीत 2023 साली सुरु झाला पाहिजे, अशाप्रकारचं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

वाढीव खर्चाच नियोजन कसं करणार?

मेट्रोच्या वाढीव खर्चाचे नियोजनाबाबत महाराष्ट्र सरकारवर इक्विटीच्या 50 टक्के खर्च देण्याची जबाबदारी आहे, 50 टक्के इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे जायका देणार आहे, वाढीव पैसे देण्यासही जायकाने तयारी दाखवलीय. त्यामुळे आता अतिशय वेगाने हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करु, साधारणपणे हा ज्यावेळी सुरु होईल तेव्हा 13 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. 6 लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यावरुन कमी होतील. 2031 पर्यंत 17 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. त्यामुळे या प्रकल्पातून मुंबईसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.