शारीरिक संबंध ठेव नाहीतर…, भोंदूबाबाच्या लॉकेटचं रहस्य काय? महिला उद्ध्वस्त, अनेक वर्ष लैंगिक शोषण आणि…
Ashok Kharat Scandal : अशोक खरातचं आणखी एक काळं सत्य समोर, भोंदूबाबाने महिलेला दिलेल्या रॉकेटचं रहस्य काय? अनेक वर्ष लैंगिक शोषण, महिलेला धमकी देत म्हणालेला, 'शारीरिक संबंध ठेव नाही तर, नाहीतर...'

Ashok Kharat Scandal : स्वयंघोषित धार्मिक नेता आणि ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात यांच्या अटकेनंतर त्यांच्याबद्दल नवीन खुलासे होत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात सेक्स स्कँडलने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी व्यक्ती यामध्ये सामिल आहेत. आता एका पीडित महिलेने भोंदू बाबावर गंभीर आरोप केले आहे. धमकी देत अनेक वर्ष बलात्कार केल्याचे आरोप पीडितेने केले आहेत. शारीरिक संबंध ठेव नाही तर, तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल… अशी धमकी भोंदूबाबाने महिलेला दिलेली… धक्कादायक गोष्ट म्हणजे, पोलिसांनी खरात याच्याकडून महिलेसंबंध तब्बल 58 आपत्तिजनक जप्त केले आहेत. सांगायचं झालं तर, अशोक खरात याचं वर्ष 67 आहे.
भोंदूबाबाने महिलेला असं फसवलं जाळ्यात…
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा सिन्नर तालुक्यातील मिरगाल येथील श्री ईशानश्वार महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पीडित महिला पहिल्यांती 2019 मध्ये नातेवाईकांसोबत बाबांना भेटण्यासाठी गेली होती… लग्नासाठी योग्य जोडीदार मिळू शकेल, म्हणून महिला भोंदू बाबाला भेटण्यासाठी गेलेली.. पण कोरोना महामारीमुळे, तिला काही काळ कॅप्टनशी पुन्हा संपर्क साधता आला नाही.
अखेर 2-22 मध्ये, जेव्हा तिला लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा ती त्याला भेटायला गेली. भेटीदरम्यान, कॅप्टनने तिला एक लॉकेट दिलं. ते देताना त्याने तिला सांगितलं की, ते कधीही काढू नकोस, नाहीतर तुझे नातेसंबंध बिघडतील. अशात परीक्षेसाठी गेलेल्या महिलेला लॉकेट काढावा लागला. त्यानंतर एका आठवड्यात महिलेचं लग्न मोडलं. अशात बाबाबद्दल महिलेच्या मनात असलेला आणखी दृढ झाला..
तेव्हा बाबाने महिलेला त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगितलं आणि काही विधी करायला सांगितल्या. पीडित महिलेने सांगितल्यानुसार, बाबाने महिलेला एक काढा प्यायला दिला आणि पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केले… ज्यामुळे महिलेचं शरीर सुन्न पडलं होतं.. त्यानंतर भोंदूबाबाने धमकी दिली की, शारीरिक संबंधांना नकार दिला तर लग्न कधीच होणार नाही…
महिलेचं लग्न झाल्यानंतर देखील बाबा महिलेला त्रास देत होता आणि हे 2025 पर्यंत सुरु होतं. त्याने त्या महिलेला, त्याच्या लैंगिक मागण्या पूर्ण न केल्यास तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या मिरगाव येथील घरातून कागदपत्रे, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमधून काही आक्षेपार्ह क्लिप्ससह एकूण 58 व्हिडिओ जप्त करण्यात आले.
