काय चाललंय हे? वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्याच गळ्यात टाकली दोर, औरंगबादेत दोघे अटकेत

काय चाललंय हे? वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्याच गळ्यात टाकली दोर, औरंगबादेत दोघे अटकेत
लासूर स्टेशन परिसरातील घटना

लासूर स्टेशन गावात दोन भांडणाऱ्या व्यक्तींमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या जीवावर बेतले. यातील आरोपींनी पोलिसावरच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 15, 2021 | 10:12 AM

औरंगाबादः शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्याच जीवावर नागरिक (Attack on police) उठले तर काय होईल? गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सतर्क पोलिसांच्या जीवावर बेतल्याची अशीच एक घटना नुकतीच औरंगाबादमध्ये घडली. लासूर स्टेशनमध्ये दोन व्यक्तींमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. या वादाचे भांडणात रुपांतर झाले. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाचेच प्राण घेण्याचा प्रयत्न दोघांनी केला. या भयंकर घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसाचा गळा आवळण्याचा प्रयत्न

लासूर स्टेशन या गावातील बस स्टँडवर सदर व्यक्तींमध्ये वाद सुरु होता. हा वाद मिटवण्यासाठी कृष्णा पवार हे परिसरात ड्युटीवर असलेले पोलिस घटनास्थळी गेले. मात्र भांडणारे दोघे दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे या दोघांनी पोलिसाच्या गळ्यात दोरी टाकून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी असलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण थांबवले आणि पोलिसाचे प्राण वाचले. या प्रकरणी दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

Shiv Sena| शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही, मिनी UPA चा प्रयोग सुरू; संजय राऊत यांचे वक्तव्य

अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेलेले, संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें