AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाद नेत्यांचे, दंगे कार्यकर्त्यांचे! औरंगाबादेत डॉ. भागवत कराडांच्या 8 समर्थकांवर गुन्हा, पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण प्रकरण!

पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. औरंगाबादेत रविवारी संध्याकाळी हा राडा झाला तर सकाळी बीडमध्ये प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला.

वाद नेत्यांचे, दंगे कार्यकर्त्यांचे! औरंगाबादेत डॉ. भागवत कराडांच्या 8 समर्थकांवर गुन्हा, पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण प्रकरण!
रविवारी डॉ. भागवत कराड आणि पंकडा मुंडे समर्थकांमध्ये राडा Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 11:28 AM
Share

औरंगाबादः वाद नेत्यांचे आणि भिडतात कार्यकर्ते, अशी स्थिती सध्या औरंगाबादेत पहायला मिळतेय. मराठवाड्यातील दोन भाजपा नेते पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांच्या (Dr. Bhagwat Karad) कार्यकर्त्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदावरी नाकारल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांच्या नाराजीचा उद्रेक (Aurangabad rada) औरंगाबादेत पहायला मिळाला. रविवारी दोन कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नूतन कॉलनीतील कार्यालयासमोर सायंकाळी घोषणा दिल्या. आपण पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दावा ते करत होते. कराडांचे कार्यालय फोडण्याच्या पवित्र्यात असलेल्या या कार्यकर्त्यांना डॉ. भागवत कराड यांच्या समर्थकांनी रोखले. तसेच त्यांना चांगलाच चोपही दिला. रविवारी सकाळीच बीडमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा दोन वेळा अडवण्यात आला. दरम्यान, औरंगाबादेत पंकजा मुंडे यांच्या कथित समर्थकांना मारहाण केल्याप्रकरणी कराड यांच्या 8 समर्थकांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय घडली नेमकी घटना?

काल दुपारी पंकजा मुंडे यांचे काही समर्थक डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करणार असल्याचं वृत्त दुपारच्या वेळी औरंगाबादेत पसरलं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत अनेक भाजप कार्यकर्ते आणि डॉ. कराडांचे समर्थक भाजपाच्या कार्यालयासमोर गोळा झाले. यावेळी पंकजा मुंडे यांचे दोन समर्थक तेथे आले. पंकजाताईंविषयी घोषणा बाजी करत ते आक्रमक झाले. यानंतर कराड यांच्या समर्थकांनीही या दोघांना बेदम चोप दिला. त्यातील एकाला पोलिसांच्या हवाली केले. तर दुसरा निसटला. दोन दिवसांपूर्वी सचिन डोईफोडे याच्यासह अन्य दोघांनी भाजप कार्यालयात राडा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रविवारी पुन्हा तो केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या कार्यालयावर राडा करण्यासाठी साथीदारासह आला.

दुपारी डॉ. कराड यांची पत्रकार परिषद

दरम्यान, औरंगाबादेत हा राजा सुरु असताना केंद्री यअर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड मात्र हैदराबाद दौऱ्यावर होते. आज सोमवारी ते औरंगाबादेत दाखल झाले असून या प्रकरणी दुपारी ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

‘पंकजाताई, कार्यकर्त्यांना आवरा’

पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. औरंगाबादेत रविवारी संध्याकाळी हा राडा झाला तर सकाळी बीडमध्ये प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला. दरेकर बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर असताना दोन ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला. यावेळी एका ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली. यात एक कार्यकर्ता आणि एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले. अशा प्रकारे हल्ले करणारे पंकजा मुंडे यांचे समर्थक असतील तर त्यांच्या आगामी कारकीर्दीला फटका बसू शकतो, पंकजाताईंनी समर्थकांना आवरावे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.