Aurangabad : पेट्रोल टाकल्यानंतर गाडी पुढे घेण्याचा वाद, पेट्रोल पंपावरच 2 गट भिडले! एकमेकांची कॉलर पकडून तुफान राडा

Aurangabad crime : यावेळी एकाला खाली पाडण्यात आलं. त्यानंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. वेगवेगळे तरुण एकमेकांशी भिडलेत.

Aurangabad : पेट्रोल टाकल्यानंतर गाडी पुढे घेण्याचा वाद, पेट्रोल पंपावरच 2 गट भिडले! एकमेकांची कॉलर पकडून तुफान राडा
पेट्रोल पंपावर राडाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 7:39 AM

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत मारहाणीच्या (Aurangabad Crime News) घटना वाढल्यात. आता तर क्षुल्लक कारणावरुन पेट्रोल पंपावर तुफान राडा झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबादच्या सेवन हिल परिसरात पेट्रोल पंपावर तुफान राडा (Petrol pump Fight) झाला. दोन गटात यावेळी फ्रीस्टाईल हाणामारी झाली. पेट्रोल पंपावर गाडी पुढे घेण्याचा सुरुवातीला वाद झाला. वाद विकोपाला गेला. दोन गटांत आधी बाचाबाची झाली. त्यानंतर एकमेकांवर हात उगारले गेले आणि मग वाद आणखीनच पेटला. पेट्रोल पंपवर यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीहीह गंभीर जखल घेतली आहे. एकूण सहा ते सात तरुणांना पोलिसांनी (Aurangabad Police) ताब्यात घेतलंय.

राडा होण्याआधी काय झालं?

औरंगाबादच्या सेवन हिल परिसरात पेट्रोल पंपावर तुफान राडा झाला. हा राडा होण्याआधी पेट्रोल पंपावर काही जण पेट्रोल भरण्यासाठी आले होतो. औरंगाबादच्या सेव हिल परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर काही तरुणांनी गाडीत पेट्रोल भरलं. पेट्रोल भरुन झाल्यानंतर गाडी पुढे घेण्याच्या कारणावरुन वाद झाला. यानंतर वाद वाढत गेला आणि दोन गट एकमेकांवर तुटून पडले. पेट्रोल पंपामध्ये झालेल्या या हाणामारीच्या घटनेनं एकच गोंधळ उडाला.

औरंगाबादमधील राड्याच्या या व्हिडीओमध्ये काही जण एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना मारहाण करत असल्याचं दिसतंय. यावेळी एकाला खाली पाडण्यात आलं. त्यानंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. वेगवेगळे तरुण एकमेकांशी भिडलेत. तर पेट्रोल पंपावरीलच काही जण हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतंय. पळापळ, आरडाओरडा आणि हाणामारी असा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झालाय.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून गंभीर दखल

पेट्रोल पंपावर झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. पुंडलिक नगर पोलिसांनी याप्रकरणी एकूण सहा ते सात जणांना ताब्यात घेतलंय. या सगळ्या तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी एका तरुणाला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. तरुणाला अमानुष मारहाण करताना अंगावर काटा आणणारा व्हिडीओही समोर आला होता. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात औरंगाबादेत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आलेली. आता पुन्हा एकदा फ्रीस्टाईल हाणामारी झाल्यानं औरंगाबादेत पोलिसांचा धाक खरंच उरलाय का? असा प्रश्न राड्याच्या घटनेनं उपस्थित केलाय.

Video : ही तलवारबाजी तुम्ही पाहिलीच पाहिजे!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.