मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती देणारा क्रेडिट कोर्स, लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार

मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती देणारा क्रेडिट कोर्स, लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने औरंगाबादेत लवकरच एक क्रेडिट कोर्स सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच हा कोर्स सुरु होण्याची अपेक्षा आहे. मतदान प्रक्रियेशी निगडीत महत्त्वाचे विषय समाविष्ट असलेला हा क्रेडिट कोर्स दोन सत्रांचा आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाता आयोगाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात सुरु होत आहे. […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 28, 2022 | 7:00 AM

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने औरंगाबादेत लवकरच एक क्रेडिट कोर्स सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच हा कोर्स सुरु होण्याची अपेक्षा आहे. मतदान प्रक्रियेशी निगडीत महत्त्वाचे विषय समाविष्ट असलेला हा क्रेडिट कोर्स दोन सत्रांचा आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाता आयोगाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात सुरु होत आहे. त्याच धर्तीवर येथील विद्यापीठात अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनीदेखील आयोगाचा क्रेडिट कोर्स सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्य निवढणूक आयोगाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांचे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यात अभ्यासक्रम सुरु करण्याच्या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी चर्चा झाली. या चर्चेत अभ्यासक्रमाचे स्वरुप, दोन सत्रातील विषय, सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी याबाबत चर्चा झाली. कुलगुरू डॉ. येवले यांनी अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

आयोगाचे प्रधान सचिव काय म्हणाले?

राज्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील उर्वरीत विद्यापीठांमध्येही अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत तयारी दर्शवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. सहा महिन्यांचे एक सत्र अशा दोन सत्रांचा हा अभ्यासक्रम आहे. यात मतदान प्रक्रियेशी निगडित महत्त्वाचे शिक्षण असेल.

इतर बातम्या-

नोकरीवर घ्या नाही तर आत्महत्या करतो, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल!

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर – गिरीश महाजन


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें