PHOTO | नवराईला न्यायला हेलिकॉप्टर, लेकीच्या निरोपासाठी अख्खा गाव हेलिपॅडवर जमला, औरंगाबादच्या लग्नाची गोष्ट!

औरंगाबादः औरंगाबादमध्ये सध्या एका लग्नाची गोष्ट चांगलीच गाजतेय. आपल्या लाडक्या नवराईला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं. याच हेलिकॉप्टरमध्ये बसवून पत्नीला वाजत-गाजत आपल्या घरी घेऊन जाणार, असा हट्ट नवरोबानं अनेक दिवसांपासून लावला होता. अखेर कुटुंबीय आणि नातेवाईकांना हा हट्ट पुरवला अन् लग्न झाल्यावर नवरीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरही आणलं गेलं. औरंगाबादमधील जिल्ह्यातील करमाड येथील लग्नाची ही […]

PHOTO | नवराईला न्यायला हेलिकॉप्टर, लेकीच्या निरोपासाठी अख्खा गाव हेलिपॅडवर जमला, औरंगाबादच्या लग्नाची गोष्ट!
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 2:54 PM

औरंगाबादः औरंगाबादमध्ये सध्या एका लग्नाची गोष्ट चांगलीच गाजतेय. आपल्या लाडक्या नवराईला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं. याच हेलिकॉप्टरमध्ये बसवून पत्नीला वाजत-गाजत आपल्या घरी घेऊन जाणार, असा हट्ट नवरोबानं अनेक दिवसांपासून लावला होता. अखेर कुटुंबीय आणि नातेवाईकांना हा हट्ट पुरवला अन् लग्न झाल्यावर नवरीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरही आणलं गेलं. औरंगाबादमधील जिल्ह्यातील करमाड येथील लग्नाची ही गोष्ट आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड गावांमध्ये नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॅप्टर आणलं होतं मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावावरून हेलिकॉप्टर फिरवत नवरदेव नवरीला सासरी घेऊन गेलाय. या लग्नातल्या नवरदेवाचं नाव राम लांडे असं आहे तर चित्रा कोरडे असं नवविवाहित नवरीचं नाव आहे.

नवरदेवानं नवरीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर आणलं. पण लाडक्या लेकीला निरोप देताना इकडे माहेरच्या लोकांचे डोळे पाणावले होते. हॅलिकॉप्टरमध्ये बसून सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्ख गाव हेलिपॅड वर लोटलं होतं .

औरंगाबादमध्ये करमाडमधील या शाही विवाह सोहळ्याचीच चर्चा आहे.

करमाड येथील या अनोख्या लग्नात नवराईला निरोप देण्यासाठी अवघा गाव एकवटला होता.

इतर बातम्या- 

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या का नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

तेरे हाथ में मेरा हाथ हो…, सूर्याच्या साक्षीने फरहान आणि शिबानीचं ‘गोल्डन’ फोटोशूट