AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad : रक्तबंबाळ अवस्थेत तो विव्हळत होता, लोकं Video काढत राहिले आणि माणुसकी मेली!

रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला पाहून लोकांची एकच गर्दी जमू लागली. काय झालंय? हे पाहण्यासाठी लोकं एकवटली.

Aurangabad : रक्तबंबाळ अवस्थेत तो विव्हळत होता, लोकं Video काढत राहिले आणि माणुसकी मेली!
दुर्दैवी घटना!Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 8:16 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad Crime) नुकतीच एक घटना समोर आली होती. एका तरुणाला मारहाण (Men beaten to death) केली जातेय. तो दया मागतोय. माफी मागतोय. पण मारहाण करणारे हैवानासारखे त्याला बांबूचे फटके देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral video on Social Media) झाला होता. ही घटना औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरातली होती. जीव जाईपर्यंत या तरुणाला मारहाण करण्यात आली. त्याचा जीव गेल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. औरंगाबाद मारहाणीची ही घटना ताजी असतानाचा आता पुन्हा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. एक रक्तबंबाळ तरुण रस्त्यावर पडून आहे. तो विव्हळत असल्याचं दिसतंय. आजूबाजूला लोकं जमली आहे. तरुणाला तडफडताना ही सगळी माणसं बघत आहेत. पण एकही जण मदतीसाठी पुढे आल्याचं दिसत नाही. बघ्यांच्या गर्दीतमध्ये व्हिडीओ काढणाऱ्यांचे मोबाईलच तेवढे बाहेर आल्याचं भीषण वास्तव या घटनेनं अधोरेखित केलंय.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस चालत चालतच व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसून आलं आहे. आजूबाजूला गर्दी आधीपासूनच जमलेली आहे. घोळका तयार झालाय. घोळक्याच्या मधोमध एक धक्कादायक आणि भीषण दृश्यं दिसतं. एक माणूस रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे. तो जिथं पडलाय, तिथं मोठ्या प्रमाणात रक्त सांडलंय. हे रक्त त्यांच्या शर्टाला, डोक्याला, मानेला लागलेलंय. तो विव्हळतोय. तडफडतोय. आजूबाजूची गर्दीही त्याला मदत करण्यासाठी पुढे यायला घाबरतेय, असं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकी की हा तरुण जागेवरुन उठणं तर दूरच पण रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या डोक्यापासून पाठीपर्यंत रक्तच रक्त दिसत होतं. या तरुणाला उठताही येत नव्हतं. अर्धबेशुद्ध अवस्थेत हा तरुण तडफडत होता. विव्हळत होता.

जखमी रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला पाहून लोकांची एकच गर्दी जमू लागली. काय झालंय? हे पाहण्यासाठी लोकं एकवटली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासमोर घोळका जमला. मोबाईलमधून लोकं रक्तबंबाळ तरुणाचे व्हिडीओ रेकॉर्ड करु लागले. काय झालं? काय झालं? यावरुन कुजबूज सुरु झाली. पण रक्तबंबाळ तरुणाच्या मदतीसाठी एकही जण पुढे आला नाही.

काय झालं होतं?

हा तरुण नेमका कोण आहे? याची माहिती मिळू शकलेली नाही. या तरुणाला मारहाण झाल्यानंतर त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्यक्तिगत वादातून या तरुणाला मारहाण झाली असावी, अशी शंका घेतली जातेय. पण या तरुणाला मारहाण कुणी केली? कशी केली? यावरुन चर्चांना उधाण आलंय. औरंगाबाद आठवड्याभराच्या आतच समोर आलेल्या आणखी एका धक्कादायक व्हिडीओनं खळबळ उडवली आहे. हे दोन्हीही व्हिडीओ सध्या औरंगाबादच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.