AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद शहरातील नद्या जिवंत करणार, काय आहे अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन?

मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने एनआययुए, व्हेरॉक आणि इकोसत्त्वसोबत भागीदारी करून शहरातील खाम आणि सुखना नदी, कमल तलाव, सलीम अली सरोवर, नहरी, विहीरी इत्यादी जलस्रोत आणि नद्यांच्या व्यवस्थापनाची योजना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

Aurangabad | औरंगाबाद शहरातील नद्या जिवंत करणार, काय आहे अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन?
| Updated on: Jul 07, 2022 | 9:48 AM
Share

औरंगाबाद: शहरातील खाम (Kham River) आणि सुखना (Sukhana) या मौसमी नद्यांना पुनरुज्जिवित करण्यासाठीची योजना महापालिकेतर्फे आखली जाणार आहे. मनपा आणि स्मार्ट सिटी नॅशल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स आणि इकोकस्त्वच्या मदतीने अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येत आहे. लवकरच या प्लॅनअंतर्गत नद्या जिवंत करण्यासाठीचे काम सुरु होईल, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे. औरंगाबाद हे रिव्हर सिटीज अलायन्स (आरसीए) चे सदस्य शहर आहे. भारतातील 30 नदी असणाऱ्या शहरांची पहिली युती आहे, जी नमामि गंगे (Namami Gange) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआययुए) यांनी स्थापन केली आहे. रिव्हर सिटीज अलायन्स अंतर्गत, एनआययुए आणि नमामि गंगे देशातील नद्यांचे व्यवस्थापनासाठी शहर पातळीवर अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन तयार करत आहेत. ह्यामध्ये मूलत: सर्व शहरांनी त्यांच्या नद्यांना स्वच्छ करण्याचा दृष्टीने आणि दहा-सूत्री अजेंडाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

शहरातील जलस्रोतांचेही व्यवस्थापन

औरंगाबाद महानगरपालिका मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली खाम नदी पुनर्संचयित करण्याचे काम सुरु आहे. मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने एनआययुए, व्हेरॉक आणि इकोसत्त्वसोबत भागीदारी करून शहरातील खाम आणि सुखना नदी, कमल तलाव, सलीम अली सरोवर, नहरी, विहीरी इत्यादी जलस्रोत आणि नद्यांच्या व्यवस्थापनाची योजना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणून, एनआययुए, महानगरपालिका, स्मार्ट सिटीच्या प्रतिनिधींनी 5 जुलै 2022 रोजी खाम नदी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि शहरातील काही जलस्रोतांना भेट दिली. या भेटीत जलस्रोतांच्या विद्यमान स्थितीची माहिती घेण्यात आली.

महापालिकेच्या बैठकीत काय?

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात यासंबंधी बैठक बुधवारी पार पडली. यावेळी शहरातील भागधारकांशी सल्लामसलत करून अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यासाठी, अॅक्शन ग्रूप तयार करण्यात आला आहे. या बैठकीत ह्या गटाच्या सदस्यांनी औरंगाबादमधील नद्या आणि जलस्रोतांच्या सर्वांगीण व्यवस्थापनासाठी त्यांचे अनुभव आणि कल्पना मांडल्या. शहरातील खाम आणि सुखना नदी आणि शहरातील इतर जलस्त्रोत जसे की कमल तलाव, सलीम अली सरोवर, नहर, विहीर इत्यादी. पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासन आणि भागधारकांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय, स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, एनआययुए चे टीम लीड विक्टर शिंदे, निकिता मदान, इशलिन कौर , इको सत्त्वाच्या सीईओ गौरी मिराशी, टेक्निकल एक्स्पर्ट आश्विन परांजपे, सुहिता दुगर, मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव, शहर अभियंता सखाराम पानझडे, वेरॉक चे सतीश मांडे, राहुल टेकाळे, औरंगाबाद फर्स्ट चे रणजित कक्कड, हेमंत लांडगे, मानसिंग पवार, सीआयआयचे अमोल मोहिते, मनपाचे हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, असद्दुला खान, मनीष निरंजन, बी. आर. वाघमारे, वक्फ बोर्ड चे एम. ए. पठाण, बामुचे डॉ. एम. बी. मुळे, एमपीसीबीचे एस. एस. राठोड, पी. इ. एस. कॉलेज चे दिपक काकडे, फॉरेस्ट ऑफिसर डी. बी. तोर, एमआयटीचे के. के. भाटिया यांची उपस्थिती होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.