AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचा गेल्या दोन दिवसांपासून नुसता तमाशा सुरुय; ठाकरे गटाची शिवसेनेवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे यांनी अगोदर राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणा केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे जणू काही हेच राम भक्त आहेत, हेच धनुष्यबाणवाले आहेत आणि ठाकरे गटाचे आम्ही कोणीच नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांचा गेल्या दोन दिवसांपासून नुसता तमाशा सुरुय; ठाकरे गटाची शिवसेनेवर बोचरी टीका
| Updated on: Apr 09, 2023 | 8:08 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या दौऱ्याचे शिंदे गटाकडून समर्थन केल जाते तर, विरोधकांकडून पाप धुण्यासाठी म्हणून हा अयोध्या दौरा काढला असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यावरूनच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी कडवट हिंदुत्ववादी आणि धार्मिकही आहे, परंतु काम सोडून मी देवदर्शनासाठी जात नसल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावर घोडे, गाड्या घेऊन गेले आहेत मात्र हा नुसता त्यांचा तमाशा सुरू असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले परंतु यांचा असा थाट आहे की जसे काय यांनीच राम मंदिर निर्माण केले असल्याचा घणाघातही त्यांनी शिंदे गटावर केला आहे.

चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेवर टीका करताना एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी बंडखोरी करून सत्तांतर केले असल्यानेही त्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे “मुंह में राम बगल में छुरी” असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले होते. त्यावरूनही त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत एकनाथ शिंदे खंजीर खुपसला असल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, मी अनेक वेळेला अयोध्याला गेलो आहे, त्याच बरोबर मी कार सेवाही केली आहे.

त्यावेळी आता बसवलेली राममूर्ती ही आम्ही त्यावेळेस 6 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजता बसवली होती अशी माहितीही त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देश्यून सांगितली.

तर उद्धव ठाकरे यांनी अगोदर राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणा केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे जणू काही हेच राम भक्त आहेत, हेच धनुष्यबाणवाले आहेत आणि ठाकरे गटाचे आम्ही कोणीच नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे अयोध्येला जाऊन उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात.

ही टीका करण्यासाठीच तुम्ही अयोध्येला गेला आहात का ? असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे. श्रीराम एक वचनी होते, परंतु एकनाथ शिंदे हे अनेक वचनी असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. जे उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते श्रीरामाचे काय होणार असा स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...