Aurangabad | तुमचे वाहन 15 वर्षांपेक्षा जुने आहे? 1 एप्रिलपासून पुनर्नोंदणी शुल्क 8 पटींनी महागणार

औरंगाबादः राज्य परिवहन मंडळातर्फे (State transport) राज्यातील जुन्हा वाहनांसाठीचे नियम (Rules for old Vehicles) आता अधिक कठोर करण्यात आले आहेत. 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचे पुनःनोंदणी शुल्क अर्थात री रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकलचे शुल्क चांगलेच महाग होणार आहे. या वाहनांच्या नूतनीकरण (Renew) करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटींनी वाढणार आहे. सध्या जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी […]

Aurangabad | तुमचे वाहन 15 वर्षांपेक्षा जुने आहे?  1 एप्रिलपासून पुनर्नोंदणी शुल्क 8 पटींनी महागणार
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: driving-tests.org
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः राज्य परिवहन मंडळातर्फे (State transport) राज्यातील जुन्हा वाहनांसाठीचे नियम (Rules for old Vehicles) आता अधिक कठोर करण्यात आले आहेत. 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचे पुनःनोंदणी शुल्क अर्थात री रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकलचे शुल्क चांगलेच महाग होणार आहे. या वाहनांच्या नूतनीकरण (Renew) करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटींनी वाढणार आहे. सध्या जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 500 ते 600 रुपये लागतात. मात्र एक एप्रिलनंतर कारमालकाला पाच हजार रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. तसेच दुचाकी वाहनधारकांसाठीही हे शुल्क महागणार आहे. त्यामुळे वाहनाची फिटनेस चाचणी करायची असल्यास ती महिनाभराच्या आतच करुन घेणे वाहनधारकांना सोयीचे होणार आहे.

पुनः नोंदणी करण्यासाठीचे नियम काय?

  1. -खासगी वाहनांची पुनः नोंदणी करण्यासाठी एखाद्या वाहनधारकाला उशीर झाला तर त्याला दरमहा तीन हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
  2.  तसेच व्यावसायिक वाहनांसाठी (Goods Carrier) दर महिन्याला पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
  3.  नव्या नियमाप्रमाणे 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या प्रत्येक खासगी वाहनाला दर पाच वर्षांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागणार आहे.
  4. इम्पोर्टेड कारसाठी पंधरा हजारांऐवजी 40 हजार रुपये मोजावे लागतली.
  5. जुन्या ट्रान्सपोर्ट आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीचा खर्चही एक एप्रिलपासून वाढणार आहे.
  6. फिटनेस चाचणीसाठी 1 एप्रिलपासून टॅक्सीकरिता एक हजार रुपयांऐवजी सात हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
  7. बस आणि ट्रककरिता फिटनेस चाचणीसाठी दीड हजार रुपयांऐवजी 12 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
  8. बस आणि ट्रक करिता फिटनेस चाचणीसाठी दीड हजार रुपयांऐवजी 12 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
  9.  तसेच 8 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे.

इतर बातम्या-

वन रँक वन पेन्शन धोरण कायम, 1 जुलै 2019 पासून पेन्शनचा आढावा घेण्याचे निर्देश

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.