Aurangabad | नूतनीकरणानंतर नाटक महागले, संत एकनाथ रंगमंदिराची दामदुप्पट भाडेवाढ, काय आहेत नवे दर?

| Updated on: Mar 22, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिराला सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक व राजकीय अशा विविध चळवळींचा इतिहास आहे. रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी महालाकिने नुकताच साडे आठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

Aurangabad | नूतनीकरणानंतर नाटक महागले, संत एकनाथ रंगमंदिराची दामदुप्पट भाडेवाढ, काय आहेत नवे दर?
संत एकनाथ रंगमंदिर, औरंगाबाद
Image Credit source: ट्विटर
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेने शहरातील संत एकनाथ रंगमंदिराचे (Sant Ekenath Rangmandir) नुकतेच नूतनीकरण केले आहे. मोठ्या थाटामाटात याचे उद्घाटनही झाले. कोरोनाचे सावट काहीसे कमी होऊ लागल्याने नाट्यकलावंतांनाही हुरुप येऊ लागला. मात्र मनपाने नाट्यमंदिराच्या खासगीकरणाची (Privatization) योजना आणली. सर्व पातळ्यावरून या निर्णयाला विरोध झाल्यानंतर आता महापालिकेने हा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. मात्र नाट्यमंदिरातील नाटक आणि आदी कार्यक्रमांसाठीचे (Cultural Program) भाडे दुप्पट प्रमाणात जाहीर केले आहेत. तीन तासांच्या एका नाटकाच्या प्रयोगासाठी तब्बल 20 हजार रुपये एवढे भाडे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांचा हिरमोड झाला आहे.

संत एकनाथ मंदिराला सांस्कृतिक, राजकीय इतिहास

औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिराला सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक व राजकीय अशा विविध चळवळींचा इतिहास आहे. रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी महालाकिने नुकताच साडे आठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता येथील सुविधांचा दर्जा भविष्यातही असाच राहावा, याकरिता महापालिकेने नाट्यमंदिराच्या खासगीकरणाची प्रक्रिया हाती घेतली होती. त्याला रंगकर्मी आणि राजकय मंडळींकडूनच विरोध झाला. त्यामुळे हा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मात्र नाट्यमंदिराचे व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीचे खासगीकरण लवकरच केले जाणार आहे. खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने रंगमंदिराच्या भाड्यात मोठ वाढ केली आहे.

कसे असतील नवे दर?

– नाटकाच्या एका प्रयोगासाठी 20 हजार रुपये भाडे आकारले जाईल. तसेच 25 हजार रुपये अनामत रक्कमही भरावी लागेल.
– लावणीच्या कार्यक्रमासाठी 30 हजार रुपये भाडे तर 50 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.
– शालेय कार्यक्रम, बक्षीस समारंभासाठी 15 हजार रुपये भाडे आणि 25 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.
– शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, सभा, संमेलने, परिषदा, जादूचे प्रयोग आदी कार्यक्रमांसाठी 25 हजार रुपये भाडे आणि 25 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.
– शालेय कार्यक्रमांसाठी रंगीत तालमीदेखील येथे घेतल्या जातात. त्यासाठी 5 हजार रुपये भाडे व 10 हजार रुपये अनामत रक्कम भारवी लागेल. त्याशिवाय 18 टक्के जीएसटी लागेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

इतर बातम्या-

Runway 34 trailer: सत्य घटनेवर आधारित अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा ‘Runway 34’; पहा उत्कंठावर्धक ट्रेलर

जनाब Devendra Fadnavis जी… चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला झुकला नाही का? शिवसेनेनं आरसा दाखवला