Runway 34 trailer: सत्य घटनेवर आधारित अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा ‘Runway 34’; पहा उत्कंठावर्धक ट्रेलर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Mar 21, 2022 | 3:42 PM

अजय देवगणने (Ajay Devgn) विमान अपघात होण्यापासून रोखलं की इतर कुठली गंभीर घटना घडली, असे प्रश्न मनात उपस्थित करणारा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'रनवे 34' (Runway 34) असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अजय वैमानिकाच्या भूमिकेत आहेत.

Runway 34 trailer: सत्य घटनेवर आधारित अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा 'Runway 34'; पहा उत्कंठावर्धक ट्रेलर
Runway 34
Image Credit source: Twitter
Follow us

अजय देवगणने (Ajay Devgn) विमान अपघात होण्यापासून रोखलं की इतर कुठली गंभीर घटना घडली, असे प्रश्न मनात उपस्थित करणारा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रनवे 34’ (Runway 34) असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अजय वैमानिकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरवरून अजयचं पात्रं रहस्यपूर्ण असल्याचं दिसून येत आहेत. त्याच्यासोबत को-पायलटची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साकारली आहे. अजय आणि रकुल मिळून काहीतरी सत्य लपवतायत आणि ते सत्य नेमकं काय आहे, याचं उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळू शकेल. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कॅप्टन विक्रांत खन्ना यांची भूमिका अजयने साकारली आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने अजयने सहा वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन केलंय. 2016 मध्ये त्याने ‘शिवाय’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला, “डोळे बंद करा आणि विचार करा, आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती एकदा तरी आली असेल जेव्हा आपण एका क्षणासाठी सर्वांत शक्तीशाली आहोत असं वाटेल आणि पुढच्याच क्षणी पूर्णपणे असहाय्य आहोत असं वाटू लागतं. आपण जग जिंकू शकू असं वाटत असतानाच सर्वकाही हातातून निसटल्यासारखं होतं. हे एक भयानक स्वप्न आहे की वास्तव, हेच कळत नाही. अशाच भावनांशी निगडीत हा चित्रपट आहे.”

रनवे 34 या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण एफ फिल्म्स, कुमार पाठक, विक्रांत शर्मा, संदीप केवलानी, तारलोक जेठी, हस्नैन हुसैनी आणि जय कनुजिया यांनी केली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा:

“एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर..”; The Kashmir Files वर आमिर खानची प्रतिक्रिया

Sonam Kapoor होणार आई; बेबी बंपचे फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI