“एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर..”; The Kashmir Files वर आमिर खानची प्रतिक्रिया

एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर..; The Kashmir Files वर आमिर खानची प्रतिक्रिया
Aamir Khan on The Kashmir Files
Image Credit source: Twitter

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासून हा चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा दाखविणाऱ्या या चित्रपटाने दहा दिवसांत 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

स्वाती वेमूल

|

Mar 21, 2022 | 2:42 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासून हा चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा दाखविणाऱ्या या चित्रपटाने दहा दिवसांत 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यामध्ये आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धा (Aamir Khan) सहभागी झाला आहे. आमिरने RRR या चित्रपटाच्या प्रमोशनला हजेरी लावली होती. यावेळी त्याला द काश्मीर फाईल्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. आमिरने हा चित्रपट अद्याप पाहिला नसून लवकरच तो पाहणार असल्याचं त्याने सांगितलं. त्याचसोबत चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचंही त्याने कौतुक केलं.

काय म्हणाला आमिर खान?

“द काश्मीर फाईल्स हा चित्रपट मी नक्की पाहीन. कारण इतिहासातील ते एक असं पान आहे, ज्यामुळे आपलं मन दुखावलंय. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं, ते अत्यंत दु:खद आहे. अशा विषयावर जर चित्रपट बनवला असेल तर प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहायला हवा. एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर त्याची काय अवस्था होत असेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. माणुसकीवर ज्या लोकांना विश्वास आहे, त्यांच्या भावनांना हा चित्रपट स्पर्श करतो. त्यामुळे मी हा चित्रपट आवर्जून पाहीन. हा चित्रपट यशस्वी ठरतोय, याचाही मला खूप आनंद आहे,” अशा शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली.

द काश्मीर फाईल्सने बॉक्स ऑफिसवर जणू कमाईची त्सुनामीच आणली आहे. रविवारी या चित्रपटाने सर्वाधिक 26.20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 167.45 कोटी रुपये झाली आहे. या आठवड्यात 200 कोटींचाही टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने तब्बल 70.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दुसरा शुक्रवार- 19.15 कोटी रुपये
दुसरा शनिवार- 24.80 कोटी रुपये
दुसरा रविवार- 26.20 कोटी रुपये

हेही वाचा:

कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; “समाजात कसं वावरावं याचं भान..”

‘पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध काश्मीर फाईल्स? कुठे चाललोय आपण?’; विजू मानेंची मार्मिक पोस्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें