“हा फौजदारी गुन्हा..”; The Kashmir Files वरून विवेक अग्निहोत्रींची हरियाणा मुख्यमंत्र्यांना विनंती

हा फौजदारी गुन्हा..; The Kashmir Files वरून विवेक अग्निहोत्रींची हरियाणा मुख्यमंत्र्यांना विनंती
Vivek Agnihotri
Image Credit source: Twitter

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरून दोन गट पडले आहेत. एक गट या चित्रपटाच्या बाजूने उभा आहे, तर दुसरा गट त्यावर आणि दिग्दर्शकांवर निशाणा साधतोय.

स्वाती वेमूल

|

Mar 21, 2022 | 9:18 AM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरून दोन गट पडले आहेत. एक गट या चित्रपटाच्या बाजूने उभा आहे, तर दुसरा गट त्यावर आणि दिग्दर्शकांवर निशाणा साधतोय. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री केला असून हरियाणामध्ये ‘द काश्मीर फाईल्स’च्या मोफत स्क्रीनिंगवरून विवेक अग्निहोत्रींनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबतची पोस्ट शेअर करत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे (Haryana CM) विनंती केली आहे.

हरियाणाच्या रेवाडीमध्ये रविवारी संध्याकाळी एका पार्कमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर आक्षेप घेत विवेक अग्निहोत्रींनी ट्विट केलं. ‘अशाप्रकारे द काश्मीर फाईल्स उघड आणि मोफत दाखवणं हा फौजदारी गुन्हा आहे. मनोहरलाल खट्टरजी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे थांबवा. राजकीय नेत्यांनी सर्जनशील व्यवसायाचा आदर केला पाहिजे आणि खरा राष्ट्रवाद आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर पद्धतीने आणि शांततेनं तिकीट खरेदी करणं होयं’, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं. त्यांच्या या ट्विटनंतर या मोफत स्क्रिनिंगचं आयोजन रद्द करण्यात आलं.

द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘राधेश्याम’, ‘बच्चन पांडे’ यांसारख्या चित्रपटांचं आव्हान असतानाही विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाने कमाल केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी यांसह इतरही कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा:

कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; “समाजात कसं वावरावं याचं भान..”

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रींनी सेन्सॉर बोर्डावर असल्याचा घेतला फायदा? काय आहे सत्य?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें