The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रींनी सेन्सॉर बोर्डावर असल्याचा घेतला फायदा? काय आहे सत्य?

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 9 दिवसांत कमाईचा 140 कोटींचा आकडा पार केला आहे. पण या चित्रपटावरून वादही निर्माण झाला आहे. विवेक अग्निहोत्री हे स्वत: सेन्सॉर बोर्डावर (CBFC) असल्याने त्यांनी कोणत्याही कटशिवाय द काश्मीर फाईल्सला पास केलं, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रींनी सेन्सॉर बोर्डावर असल्याचा घेतला फायदा? काय आहे सत्य?
Vivek AgnihotriImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:05 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 9 दिवसांत कमाईचा 140 कोटींचा आकडा पार केला आहे. पण या चित्रपटावरून वादही निर्माण झाला आहे. विवेक अग्निहोत्री हे स्वत: सेन्सॉर बोर्डावर (CBFC) असल्याने त्यांनी कोणत्याही कटशिवाय द काश्मीर फाईल्सला पास केलं, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. टीएमसीचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती आणि लिहिलं होतं की, “काश्मिरी पंडितांच्या वेदनांचा द्वेष पसरवण्यासाठी, ध्रुवीकरण निर्माण करण्यासाठी आणि कोट्यवधींची कमाई करण्यासाठी वापर केला गेला आहे – फक्त भाजपचा अजेंडा पुढे नेण्यासाठी केलंय.” या आरोपांवर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं आहे.

या आरोपांना उत्तर देताना अग्निहोत्रींनी त्याला ‘फेक न्यूज’ असं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. द काश्मीर फाईल्सच्या सात दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावत अ प्रमाणपत्र दिल्याची ही बातमी आहे. या बातमीसह अग्निहोत्रींनी लिहिलं, “कृपया नेहमीप्रमाणे फेक न्यूज पसरवणं थांबवा. थोडा ब्रेक घ्या. किमान मृतांचा आदर तरी करा.”

हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं होतं आणि आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला होता. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. गोवा, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक याठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली, परंतु यावर बोलताना या चित्रपटाच्या आडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या सगळ्यांचा एक चांगला परिणाम म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतोय.

हेही वाचा:

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनावा, ते किटक नाहीत..’; The Kashmir Files वर IAS अधिकाऱ्याचं ट्विट चर्चेत

गोध्रा, जीएसटी, नोटाबंदीची आठवण करून देत प्रकाश राज यांचा टोला; The Kashmir Filesवर साधला निशाणा

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.