Sonam Kapoor होणार आई; बेबी बंपचे फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’!

Sonam Kapoor होणार आई; बेबी बंपचे फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'!
Sonam Kapoor and Anand Ahuja
Image Credit source: Instagram

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली. सोनमने इन्स्टाग्रामवर पती आनंद अहुजासोबतचे (Anand Ahuja) हे फोटो पोस्ट केले आहेत.

स्वाती वेमूल

|

Mar 21, 2022 | 12:14 PM

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली. सोनमने इन्स्टाग्रामवर पती आनंद अहुजासोबतचे (Anand Ahuja) हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप पहायला मिळतोय. सोनमच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. करीना कपूर, दिया मिर्झा, अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप आनंदी आहे’, अशी कमेंट करीनाने केली. तर ‘ही खूप गोड बातमी दिलीस. तुझ्यासाठी मी खूश आहे’, असं दियाने म्हटलंय. बॉलिवूडमधील इतरही कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Sonam Kapoor announce pregnancy)

सोनम ही अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांची मोठी मुलगी आहे. सोनम आणि आनंद अहुजा यांनी मे 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनेकदा सोनमच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. मात्र सोनमने त्या नाकारल्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. त्यानंतर सोनमने बूमरँग व्हिडीओ पोस्ट करत त्या चर्चांना पूर्णविराम दिला. सोनमने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं, ‘माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आल्याची चहा.’ अप्रत्यक्षपणे गरोदरपणाच्या वृत्तावर सोनमने तिचं बेधडक उत्तर दिलं होतं. लग्नानंतर सोनम पतीसोबत लंडनला राहायला गेली. कामानिमित्त किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती मुंबईला येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनम ही 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली. यामध्ये तिने दलकर सलमानसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘AK vs AK’ या चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. यामध्ये अनिल कपूर यांची मुख्य भूमिका होती.

हेही वाचा:

Sher Shivraj Teaser: ‘पावनखिंड’नंतर आता ‘शेर शिवराज’; अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

‘पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध काश्मीर फाईल्स? कुठे चाललोय आपण?’; विजू मानेंची मार्मिक पोस्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें