Sher Shivraj Teaser: ‘पावनखिंड’नंतर आता ‘शेर शिवराज’; अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली.

Sher Shivraj Teaser: 'पावनखिंड'नंतर आता 'शेर शिवराज'; अफजलखानाच्या वधाचा इतिहास मोठ्या पडद्यावर
शेर शिवराजचा टीझर प्रदर्शितImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 10:31 AM

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,’ असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

जवळपास 45 सेकंदांच्या या टीझरची सुरुवातच अफजलखानापासून होते. मात्र ही भूमिका कोणी साकारली, हे स्पष्ट दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा अंगावर काटा उभा करतो. या टीझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे. येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा:

‘पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध काश्मीर फाईल्स? कुठे चाललोय आपण?’; विजू मानेंची मार्मिक पोस्ट

“हा फौजदारी गुन्हा..”; The Kashmir Files वरून विवेक अग्निहोत्रींची हरियाणा मुख्यमंत्र्यांना विनंती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.