जनाब Devendra Fadnavis जी… चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला झुकला नाही का? शिवसेनेनं आरसा दाखवला

जनाब Devendra Fadnavis जी... चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला झुकला नाही का? शिवसेनेनं आरसा दाखवला
मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोटो ट्विट केले
Image Credit source: TV9

शिवसेनेकडूनही भाजपच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या फोटोचा संदर्भ देत प्रश्न विचारले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 21, 2022 | 3:16 PM

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप सेनेला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपनं शिवसेना घेरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडूनही भाजपच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या फोटोचा संदर्भ देत प्रश्न विचारले आहेत.

मनीषा कायंदे नेमकं काय म्हणाल्या?

” जनाब देवेंद्र फडणवीस जी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला आणि झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, 105 आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?” अशा शब्दात मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जुन्या एका घटनेची आठवण करुन देत प्रश्न विचारले आहेत. मनीषा कायंदे यांनी एका कोनशिलेचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांच्या नावापुढं जनाब लिहिण्यात आलंय. तर, पूनम महाजन यांच्या नावापुढं मोहतरमा लिहिण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक फोटो शेअर करत चादर चढवताना तुमचा स्वाभिमान वाकला आणि झुकला नाही? असा सवाल केला आहे.

मनीषा कायंदे यांचं ट्विट

तुमची इतकी अस्वस्थतता का?

देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी जनाब शब्दाबद्दल आक्षेप नव्हता मग आता या शब्दाबद्दल एवढा राग का? असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला आहे. तर, 105 आमदार निवडून येऊनही भाजपा सत्तेत नाही यामुळं तुमची अस्वस्थतता आहे का?, असा सवाल मनीषा कायंदे यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

एमआयएमनं महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपनं शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणीवस यांनी “एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे. अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता.

इतर बातम्या:

ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?; Nitesh Rane यांचा सवाल

Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ, मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवली


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें