ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?; Nitesh Rane यांचा सवाल

संजय राऊतांना किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?, असा सवाल करतानाच संजय राऊतांसारखी माणसं तुमच्या सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात.

ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?; Nitesh Rane यांचा सवाल
nitesh raneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 3:07 PM

संतोष जाधव, तुळजापूर: संजय राऊतांना (sanjay raut) किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार (sharad pawar) साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?, असा सवाल करतानाच संजय राऊतांसारखी माणसं तुमच्या सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. विकत मिळणाऱ्या लोकांबद्दल बोलू नये असं म्हणतात, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली. मी चांगल्या कामासाठी आलोय. देवदर्शनासाठी आलोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर बाहेर काढावं, त्यांना आमच्याबरोबर मैदानात आणा, हीच तुळजाभवानीकडे मागणी आहे, असंही नितेश राणे (nitesh rane) म्हणाले. घरात बसून मुख्यमंत्र्यांना कंटाळा आला नसेल. पण आम्हाला ते घरात बसल्याचा कंटाळा आला आहे. आमचे म्हणणे एवढंच आहे की, त्यांनी मैदानात यावं. मर्दासारखे लढावं. आम्हाला नोटिसा पाठवून नामर्दासारखं लढू नका, अशी टीकाही त्यांनी केली.

नितेश राणे आज कुटुंबीयांसह तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूरला आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही. ती दाऊद इब्राहिमीची बी टीम झाली आहे. त्यामुळे शिवजयंती किंवा इतर ठिकाणी त्यांचा उत्साह तुम्हाला दिसणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या काय?

शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही म्हणून तर अजानची स्पर्धा घेतात का? कॅलेंडरवर हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे हे कोणी म्हटलंय? हे शिवसेनेने म्हटलंय. हिंदुंचा प्रत्येक सण आला की त्यावर निर्बंध टाकणारे हेच सरकार आहे. अन्य धर्मियांच्या सणावर निर्बंध दिसणार नाहीत. सगळ्याबाबतीत हिंदुवर अन्याय होत असेल तर मग हिंदुत्वाची व्याख्या काय आहे यांची? मुंबई- महाराष्ट्रातील हिंदू सुरक्षित नसेल तर मग काय? आज रझा आकादमीसारख्या संघटना हिंदुंवर ऊठसूठ अन्याय करत असतील तर मग त्यांच्यावर या लोकांना बंदी टाकायची नाही मग यांची हिंदुत्वाची व्याख्या काय?, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेना-राष्ट्रवादी दाऊदची बी टीम

आम्हाला सत्तेसाठी लाचार व्हायची गरजच नाही. सत्तेसाठी सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासमोर कोण लाचार झाले हे बघितलंय. आम्हाला बी टीम म्हणण्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दाऊदची बी टीम आहे हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. दाऊदच्या बिझनेस पार्टनरच्या मांडीला मांडी लाऊन तुम्ही सत्तेत बसता आणि त्या नवाब मलिकचा राजीनामा घेत नसाल तर मग दाऊदची बी टीम ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे हे कबूल करा, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

कपाळाला माती लावत अमित ठाकरे Shivneri समोर नतमस्तक, ढोलही वाजवला; शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात

Kolhapur North By Election: कोल्हापूर उत्तरची निवडणूक भाजपनेच लादली; सतेज पाटील यांचा आरोप

Maharashtra News Live Update : कोकणातील रस्त्यांचा प्रश्न लोकसभेत

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.