AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतल्या चाँदनी चौकच्या धर्तीवर औरंगाबादेत स्ट्रीट्स फॉर पीपल्सचा प्रयोग, महापालिकेची व्यापाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबाद महापालिका आता शहरातील प्रमुख बाजारपेठांचं, प्रमुख रस्त्याचं रुप पालटण्याची योजना आखत आहे. शहरातील प्रमुख चार रस्त्यांवर नागरिकांना पायी चालत खरेदीचा आनंद लुटता यावा, यासाठी पालिका लवकर ही योजना राबवणार आहे.

दिल्लीतल्या चाँदनी चौकच्या धर्तीवर औरंगाबादेत स्ट्रीट्स फॉर पीपल्सचा प्रयोग, महापालिकेची व्यापाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः दिल्लीतलच्या चाँदनी चौकात ज्या प्रमाणे फक्त पायी फिरून खरेदीचा आनंद लुटता येतो, तोच अनुभव औरंगाबादेतल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये देण्याचा प्रयत्न औरंगाबाद महापालिका करणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून स्ट्रीट्स फॉर पिपल (Street For People) हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. या योजनेअंतर्गत शहरातील प्रमुख चार रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर अशी वातावरण निर्मिती केली जाईल. पैठण गेट ते गुलमंडीपर्यंतच्या रस्त्यावर अशा प्रकारचा पहिला प्रयोग केला जाईल. यासाठी महापालिकेने काल येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि प्रकल्पातील संभाव्या अडचणी जाणून घेतल्या.

कोणत्या चार रस्त्यांचा समावेश?

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चा स्ट्रीट्स फॉर पीपल प्रकल्प शहरात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत चार रस्ते हाती घेतले आहे. कनॉट परिसर, एमजीएम प्रियदर्शनी रस्ता, क्रांती चौक ते गोपाल टी आणि पैठणगेट ते गुलमंडी रस्त्याचा या प्रकल्पात समावेश आहे. या रस्त्यांचे सुशोभिकरण, आकर्षक रोषणाई केली जाईल. जेणेकरून ग्राहकांना येथे फिरण्यासाठी, खरेदीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

Aurangabad meeting

महापालिकेच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा

पहिला प्रयोग गुलमंडीत, पण पार्किंगची समस्या

स्ट्रीट फॉर पिपल्स या योजनेचा पहिला प्रयोग गुलमंडीत होणार आहे. याकरिता मागील काही महिन्यात स्मार्ट सिटीने पैठण गेट ते गुलमंडी या रस्त्याचे सर्वेक्षण करून एक डिझाइन तयार केले आहे. ह्या डिझाईन अंतर्गत पादचाऱ्यांना सोयीस्कर असा सुरक्षित व सुशोभित रस्ता तयार करण्यात येईल. या रस्त्यावरील व्यापाऱ्यांसोबत महापालिकेने काल विशेष बैठक आयोजित केली होती. यात स्मार्ट सिटीच्या स्नेहा नायर, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, किरण आढे, आदित्य तिवारी आणि ऋषिकेश इंगळे उपस्थित होते व व्यापारी संघ चे युसुफ मुकाती, दिलीप चोटलानी, सनी सलुजा, भारत शाह व अन्य उपस्थित होते. सादरीकरण देण्यासाठी करण्यासाठी अर्बन डिझायनर स्वप्नील श्रॉफ व दक्षा श्रॉफ होते. हे सादरीकरण पाहिल्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या समस्या मांडल्या. पार्किंगची समस्या यात मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवैध फेरीवाले आणि अन्य मुद्यांवर ही चर्चा झाली. या समस्यांवर उपाय शोधत प्रकल्पात बदल केला जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले. जानेवारी महिन्यातच या रस्त्यावर योजनेचा प्रयोग राबवला जाईल, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या ‘झळा’ शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.