AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादकरांनो, शहर स्वच्छ ठेवले तरच अमृत योजनेचा निधी, नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळ्याची शक्यता!

महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Aurangabad | औरंगाबादकरांनो, शहर स्वच्छ ठेवले तरच अमृत योजनेचा निधी, नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळ्याची शक्यता!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 27, 2022 | 10:11 AM
Share

औरंगाबादः पाणी प्रश्नाने (water issue) पेटलेल्या औरंगाबादकरांना आता नवी पाणीपुरवठा (Water Supply Scheme) योजना कधी पूर्ण होतेय, याचीच प्रतीक्षा आहे. जीर्ण झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतूनच विविध उपाययोजना करीत महापालिका प्रशासक शहरवासियांच्या (Aurangabad city) समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शहरातील 1680 कोटींची नवी पाणीपुरवठा योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरु आहे. ही योजना आणि सातारा देवळाईसाठीच्या ड्रेनेजलाइन योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून निधी मिळावा, यासाठी स्थानिक प्रसासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार, शहराचे रँकिंग चांगले असेल तरच या योजनेचा निधी मिळू शकेल. त्यामुळे आता मनपा प्रशासन व नागरिक स्वच्छतेबाबत किती जागरूक राहतात, यावर निधीचे भवितव्य अवलंबून असेल.

पाणी योजनेच्या बजेटमध्ये 400 कोटींची वाढ

राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवटा योजना मंजूर केली आहे. या योजनेचं काम सुरु झालं आहे, मात्र अत्यंत संथ गती असल्यामुळे योजना रखडतेय, तसा खर्चही वाढतोय. लोखंड आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने योजनेच्या खर्चात नुकतीच 400 कोटींची वाढ झाली आहे. मात्र निधीअभावी योजना रखडू नये, राज्य शासन व महापालिकेवरील बोजा कमी व्हावा, यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेत तिचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

पाणी समस्या सोडवण्यासाठी आणखी काय हालचाली?

  • -शहरातील पाणी प्रश्नाची दाहकता कमी करण्यासाठी हिमायतबाग येथील ऐतिहासिक शक्कर बावडी व इतर दोन विहिरींतूनही पाणी उपसा करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
  •  हे पाणी रोजाबाग येथील सेल्टिंग टँकमध्ये घेऊन शहरातील काही वसाहतींना पुरवले जाणार आहे.
  • हर्सूल तलावातून 4 ते 5 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचं काम सुरु आहेय
  • जायकवाडीच्या पंपहाऊसमधील एक पंप बदलून तिथे नवीन पंप बसवण्यात आला. त्यामुळे तिथूनही पाच एमएलडी पाणी वाढले.
  • हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडी आणि इतर दोन मोठ्या विहिरींना मुबलक पाणी आहे. तेथूनही पाणी घेण्याचं ठरलं आहे. यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
  • पाणी टंचाई कमी करण्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक प्रभागासाठी एक पालक अधिकारी नियुक्त केला आहे.
  • अधिकारी पथकामुळेच सिडको एन5 आणि एन 7 जलकुंभावरील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
  • महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा