AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात मोठी खळबळ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल; एका खासदाराला… घडामोडी वाढल्या!

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. या 6 पैकी एक यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

शिंदे गटात मोठी खळबळ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल; एका खासदाराला... घडामोडी वाढल्या!
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 17, 2026 | 6:47 PM
Share

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. या 6 पैकी एक यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती, या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

खासदार संजय देशमुख यांना नोटीस

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती, या बाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाची नोटीस घेऊन ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे स्वीयसहायक दिपक घोगल मुंबईतून संजय देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी दाखल झाले आहे.

31 तारखेला सुनावणी

मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह यवतमाळचे जिल्हाप्रमुख सह स्थानिक सेनेचे पदाधिकारी सध्या चिंचोली येथे हजर आहेत. आता या याचिकेवर न्यायालयासमोर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. बंडखोर खासदार हजर न राहिल्यास या प्रकरणाची सुनावणी त्यांच्या अनुपस्थितीत घेतल्या जाईल असे स्पष्ट निर्देश नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जून महिन्यात यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश होता. या बंडखोरीनंतर ठाकरे गटाने या खासदारांच्या अपात्रतेसाठी कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात