Aurangabad Schools | औरंगाबादच्या शाळेत प्रवेश घेताय? आधी अनधिकृत शाळांची ही लीस्ट चेक करा!

या शाळांवर लवकरच कारवाई होणार असल्यामुळे पालकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Aurangabad Schools | औरंगाबादच्या शाळेत प्रवेश घेताय? आधी अनधिकृत शाळांची ही लीस्ट चेक करा!
मराठी शाळांमध्ये आता "हॅपीनेस करिक्युलम"!
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 27, 2022 | 9:28 AM

औरंगाबादः नव्या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा (Aurangabad schools) 13 जूनपासून सुरु होणार आहेत. अनेक पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी नव्या शाळेच्या शोधातही आहेत. मात्र पालकांनी (Parents) शाळांची सखोल माहिती घेऊनच मुलांना (Students) प्रवेश द्यावेत. संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यात अशा 13 अनधिकृत शाळा असून या शाळांवर आता कारवाई होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. मांढरे यांनी गुरुवारी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या करावाईसंबंधात माहिती दिली. या शाळांवर लवकरच कारवाई होणार असल्यामुळे पालकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यता नसलेल्या शाळांवर कारवाई

महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न शाळांना राज्य शासन, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, सीआयईच्या मान्यतेसह शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मान्यता काढून घेतलेली शाळा सुरु असल्यास त्या शाळेस अनधिकृत शाळा म्हणून घोषित करावे. शाळांची यादी तत्काळ संबंधित संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक माध्यमांमध्ये घोषित करण्याच्या आणि शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिल्या आहेत. या शाळांना एक लाख रुपये दंड आणि त्या बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

अनधिकृत शाळा कोणत्या?

  •  गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील सनराइज इंग्लिश ग्लोबल अकॅडमी
  • रांजणगाव व पडेगावातील द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल
  • कन्नड तालुक्यातील वासडीतील न्यू शस्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल
  • बिडकीनची सेंट पोप इंग्लिश स्कूल
  • निल्लोड फाटा येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय
  • सिल्लोडची समर्थ इंग्लिश स्कूल
  • किराडपुरा, नारेगाव येथील अल हिदायत पब्लिक स्कूल
  •  होली नेम अकॅडमी- पडेगाव
  •  उस्मानपुऱ्यातील मेमर-ए-डेक्कन उर्दू प्रायमरी स्कूल
  •  सुराणानगर येथील सेंट पॅट्रिक पी.एस. शाळा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें