AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर आंदोलन
| Updated on: Apr 02, 2022 | 10:57 AM
Share

औरंगाबाद | नाशिक, पुण्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा (Water Supply) होऊनदेखील तेथे 1500 रुपये पाणीपट्टी आहे. मग औरंगाबादला (Aurangabad) आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना 4,500 रुपये पाणीपट्टी का, असा सवाल औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात दहा दिवसाआड पाणी येते. तेदेखील गढूळ आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यूही झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे शुद्ध आणि नियमित पाणी नसेल तर पाणीपट्टीही मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

प्रशासकांनी ऐनवेळी गैरहजर

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र वेळ देऊनही पांडेय हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी मनपातच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मनपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासकांनी सदर निवेदन स्वीकारण्याचा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे निवेदन मागवून घेतल्याचेही सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यावर खर्च 140 कोटी, उत्पन्न 36 कोटी

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र महापालिकेला या पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला तब्बल 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून पाणीपट्टीपोटी महापालिकेला यंदा केवळ 36 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात 100 कोटींपेक्षा जास्त तोटा आहे.

पाणीपुरवठा योजना जीर्ण

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अत्यंत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च सातत्याने वाढत आहे वीजेचेही कोट्यवधी रुपयांचे बिल भरावे लागते. उत्पन्न् आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासोबत सामान्यांना मुबलक पाण पुरवठा कसा करावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.

इतर बातम्या-

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.