Aurangabad | ठाकरे सरकारची कृपा, औरंगाबादेत निम्मीच पाणीपट्टी, सोमवारपासून अंमलबजावणी!

महाविकास आघाडी सरकारने पाणीपट्टी 4050 वरून 2000 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने ठराव मंजूर केला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार अशल्याचं उपायुक्त अपार्णा थेटे यांनी सांगितलं.

Aurangabad | ठाकरे सरकारची कृपा, औरंगाबादेत निम्मीच पाणीपट्टी, सोमवारपासून अंमलबजावणी!
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 4:13 PM

औरंगाबादः औरंगाबादेतील रहिवाशांना येत्या सोमवारपासून 2 हजार रुपये एवढीच पाणीपट्टी भरावी लागणार आहे. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी असूनही 8 दिवसाआड पाणी मिळणाऱ्या औरंगाबादकरांना ठाकरे सरकारने (Thackeray Government) दिलासा म्हणून हा निर्णय घेतला होता. शहरातील नवी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत येथील 4050 रुपये असलेली पाणी पट्टी निम्मीच भरा, असे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले होते. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर केला. येत्या सोमवारपासून म्हणजेच 04 जुलैपासून या आदेशाची अंमलबजावणी होतेय. जून महिन्यात राज्यातील ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. मात्र याआधी भाजपनं औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून (water issue) रान उठवलं. भर उन्हाळ्यात आठ दिवसांनी पाणीपुरवठा, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यानं पाण्याचं वेळापत्रक कोलमडून जात होतं. परिणामी सामान्य औरंगाबादकरांमध्ये प्रचंड रोष होता. भाजपनेही औरंगाबादकरांचा प्रश्न उचलून धरत जलाक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादमधील पाणी प्रश्नात लक्ष घालून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पाणीपट्टीचा निर्णयही त्यातलाच एक.

4 जुलैपासून अंमलबजावणी

महाविकास आघाडी सरकारने पाणीपट्टी 4050 वरून 2000 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने ठराव मंजूर केला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार अशल्याचं उपायुक्त अपार्णा थेटे यांनी सांगितलं. शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्ता, जिल्हाधिकारी व महापालिकेतर्फे विविध निर्णय घेण्यात येत आहेत. ज्या वसाहतींना पूर्वी आठव्या, नवव्या दिवशी पाणी येत होते. त्यांना आथा पाच दिवसाआढ पाणी देण्यात येते. त्यात आणखी सुधारणा करण्यात येत आहेत. महापालिका आय़ुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सिडको प्रशासकपदी बदली झाली आहे. तत्पूर्वी त्यांनी पाणीपट्टी कपातीचा ठरावही मंजूर केला.

सर्व वॉर्ड कार्यालयांना पत्र

04 जुलैपासून पाणीपट्टी निम्मी केल्यासंबंधीचे पत्र सर्व वॉर्ड कार्यालयांना पाठवण्यात आल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. महापालिकेने यावर्षीपासून मालमत्ता कर आणि पाणी पट्टी एकाच मागणीपत्राच्या माध्यमातून (डिमांड नोट) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यात जुने म्हणजेच 4050 रुपये एवढी पाणीपट्टीची नोंद होती. या सॉफ्टवेअरमध्ये आता 2 हजार रुपये असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांना दोन हजार रुपये पाणीपट्टी भरता येईल.

महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नती

महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे आता सिडको प्रशासक पदी रुजू होती. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिली. या निर्णयामुळे तब्बल 211 कर्मचाऱ्यांना बढती मिळाली. शुक्रवारी झालेल्या आस्थापना निवड समिती बैठकीमध्ये मनपामध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांची तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, कार्यालय आधिक्षक, लिपिक टंकलेखक लेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी या संवर्गामधील विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.