औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अतिरिक्त निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंचे निर्देश

| Updated on: Jul 13, 2021 | 6:03 PM

रंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे प्राणीसंग्रहालयाचे काम सुरु आहे. या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत.

औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अतिरिक्त निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे प्राणीसंग्रहालयाचे काम सुरु आहे. या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांनी हे प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वरील निर्देश दिले. (Aurangabad Zoo should be of international standard send additional funds proposal to government instructed Uddhav Thackeray)

मिटमिटा येथे 40 हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू

महापालिकेमार्फत सिद्धार्थ उद्यानात 14 एकर जागेवर प्राणीसंग्रहालय कार्यरत असून ते मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. येथे ससे, नीलगाय, हरिण, मोर, कोल्हे, लांडगे, तरस, सिंह, अस्वल, वाघ, हत्ती आदी वन्ययजीव आहेत. या प्राणीसंग्रहालयाला जागा कमी पडत असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे 40 हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू आहे. या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. याच विषयावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीत मिटमिटा येथील प्राणीसंग्रहालय हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे अशी इच्छा ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी अतिरिक्त जागा आणि निधी लागत असेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असेही निर्देश त्यांनी दिले.

औरंगाबाद शहराला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा : उद्धव ठाकरे

दरम्यान, आज झालेल्या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी तसेच औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळं ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत हे विचारात घेऊन प्राणीसंग्रहालयाचे काम झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या :

औरंगाबाद शहरात धावणार 9 नव्या स्मार्ट सिटी बस, प्रवाशांकडून त्रुटी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा

औरंगाबादेत संततधार, नांदेडध्ये पहिलाच मुसळधार, हिंगोलीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती, मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस

Video | शेतीच्या वादातून तुफान हाणामारी, सैन्यात नोकरीला असलेला तरुण गंभीर जखमी

(Aurangabad Zoo should be of international standard send additional funds proposal to government instructed Uddhav Thackeray)