AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहरात धावणार 9 नव्या स्मार्ट सिटी बस, प्रवाशांकडून त्रुटी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा

औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सिटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटीबसची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबाद शहरात धावणार 9 नव्या स्मार्ट सिटी बस, प्रवाशांकडून त्रुटी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा
औरंगाबाद सिटी बस
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 10:05 AM
Share

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी झालाय. रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही घट झालीय. अशावेळी औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सिटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटी बसची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या नव्या बसेससह शहरातील सिटी बसची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने 8 जूनपासून सिटीबस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (Big response to city bus in Aurangabad city, 9 new city buses for citizens)

सुरुवातीच्या टप्प्यात 8 बस सुरु करण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अजून 9 सिटीबस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून ही माहिती देण्यात आलीय. सुरक्षित आणि जल प्रवासासाठी सिटी बस उपयुक्त ठरत आहेत. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि त्रुटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडण्याचा पर्यायही महानगरपालिकेनं दिला आहे.

नव्या गाड्यांचे मार्ग –

मार्ग क्रमांक 25, सिडको ते रांजणगावमार्गे हर्सुल टी पॉईंट, दिल्लीगेट, मध्यवर्ती बसस्थानक. या मार्गावरल पहाटे सव्वा सहा वाजता पहिली बस असेल. तर शेवटची बस रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी असेल. मार्ग क्र. 22 सिडको ते रांजणगावमार्गे बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्त बसस्थानक अशी असेल. मार्ग क्र- 15, सिडको ते रांजणगावमार्गे जयस्वाल हॉल, टीव्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कूल, हिमायत बाग, दिल्ली गेट, मध्यवर्ती बसस्थानक असा प्रवास करेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉमच्या 11 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बी. कॉमचे 11 हजार विद्यार्थी अखेर उत्तीर्ण झाले आहेत. अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर कुलगुरुंनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर बी.कॉमच्या अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे.

कसा घडला प्रकार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉमच्या परीक्षेला बसलेल्या 11321 विद्यार्थ्यांची घेतली होती परीक्षा त्यांच्यातील 11137 अनुत्तीर्ण झाल्याची कुलगुरूंकडे आली होती. औरंगबादमधील विद्यार्थी संघटनांनी याप्रश्नी कुलगुर डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत हा प्रश्न मांडला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.एवढ्या मोठ्य़ा संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानं यावरुन गोंधळ देखील झाला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरच्या चुकीमुळं हा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

Video : औरंगाबादेत ऑईल गळती, तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड!

नियुक्त्या द्या अथवा सामुदायिक आत्महत्येची परवानगी द्या; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

Big response to city bus in Aurangabad city, 9 new city buses for citizens

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.