औरंगाबादेत संततधार, नांदेडध्ये पहिलाच मुसळधार, हिंगोलीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती, मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस

आता मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.  मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांत काही ठिकाणी संततधार सुरु आहे.

औरंगाबादेत संततधार, नांदेडध्ये पहिलाच मुसळधार, हिंगोलीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती, मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 11:37 PM

औरंगाबाद : मागील अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचे पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. पावसाने मागील काही दिवसांपासून मराठवाड्याकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड तसेच औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.  मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांत काही ठिकाणी संततधार सुरु आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. (rain is been reported in Aurangabad Jalna Hingoli Nanded district of  Marathwada)

औरंदाबादेत संततधार, वातावरणात गारवा

औरंगाबादेत आज सकाळपासूनच वातवरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर संध्याकाळी औरंगाबादेत काळे ढग जमा झाले. परिणामी रविवारी रात्री औरंगाबाद शहरासह वाळूज परिसर आणि जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार अनुभवायला मिळाली. सध्याचा हा पाऊस खरीप पिकासाठी संजिवनी ठरला असून येथील शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

जालन्यात ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस

जालना जिल्ह्यातील मंठा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे खरीप पिकाला चांगलाच आधार मिळणार आहे. रविवारी रात्री चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. आगामी काळातही असाच पाऊस सुरू राहिला तर पिके चांगले येतील अशी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

नांदेडमध्ये मान्सूनमधील पहिलाच मुसळधार पाऊस

नांदेड जिल्ह्यामध्येसुद्धा काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही ठिकाणी तर रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. नांदेडमधील हा पहिलाच मुसळधार पाऊस पाऊस आहे. यापूर्वी नांदेडमध्ये असा एकही मोठा पाऊस झाला नव्हता. मात्र, आता पावसाळ्यातील पहिल्याच जोरदार पावसामुळे नांदेडकर सुखावले आहेत. जुलै महिना उजाडला तरी नांदेडमध्ये कमाल तापमान 38 अंशावर स्थिर होते. मात्र आता मुसळधार पावसामुळे वातावरण अल्हाददायक झाले आहे.

हिंगोलीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. वसमत तालुक्यात तर ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. येथे एक गाडी वाहून गेल्याची माहिती आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची नोंद झाली.

इतर बातम्या :

मोठी बातमी! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत वेगाने सुधार, हलका, मऊ आहार देण्याचा डॉक्टरांचा सल्ला

खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार? प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

(rain is been reported in Aurangabad Jalna Hingoli Nanded district of  Marathwada)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.