औरंगाबादकरांना दिलासा; पाणीपट्टीत तब्बल 50 टक्क्यांनी कपात; पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

औरंगाबादकरांना दिलासा; पाणीपट्टीत तब्बल 50 टक्क्यांनी कपात; पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा
औरंगाबादच्या पाणीपट्टीत 50 टक्क्यांनी कपात, पालकमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमधील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे जनसामान्याना आर्थिक हातभारही लागणार आहे. 

महादेव कांबळे

|

May 13, 2022 | 9:49 PM

औरंगाबाद: औरंगाबादच्या पाणीपट्टीत तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली असल्याने औरंगाबादकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Guardian Minister Subhash Desai) यांनी यावेळी सांगितले की, 4 हजार रुपयांची पाणीपट्टी (Water tax) तब्बल 2 हजार रुपयांवर करण्यात आली आहे. पाणी पट्टी सुरळीत होईपर्यंत पाणीपट्टी फक्त 2 हजार रुपयेच राहणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमधील (Aurangabad) सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे जनसामान्याना आर्थिक हातभारही लागणार आहे.

औरंगाबादकरांसाठी उन्हाळा दाहकच असतो, पाण्यासाठी दाही दिशा वणवण करणारी गावं आणि वाड्यावस्त्या नेहमीच पाण्यासाठी आशावादी असतात.

ज्या प्रमाणात पाणी त्याच प्रमाणात पाणीपट्टी

औरंगाबाद पाणी असो नसो मात्र शासनाचा पाणी कर भरावा लागणारा आहे तो कायम आहे तेवढाच भरावा लागतो. औरंगाबादमधील अनेक भागांना आठ आठ तर काही भागांना दहा दहा दिवस पाणी मिळत नाही, त्यामुळे ज्या प्रमाणात पाणी मिळते, त्याच प्रमाणात पाणी पट्टी घेण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

पाणी मिळेपर्यंत ही दर कायम

नागरिकांच्या या मागणीनंतर शुक्रवारी पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी आलेले पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणीपट्टीत 2 हजार रुपयांची पाणी कपात केल्याचे घोषणा केली. औरंगाबादकरांसाठी समाधानकारक पाणी मिळेपर्यंत ही दर कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे औरंगाबादकरांसाठी कडक उन्हाळ्यातही गारवा मिळाला आहे.

पाणीपट्टी कमी; राजकीय हेतू

पालकमंत्री यांनी पाणीपट्टीत कपात केल्याची घोषणा केल्याने ही घोषणा राजकीय हेतू समोर ठेऊन घेतला गेल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील सिडको, हडको, गारखेडा परिसर तसेच जुन्या शहरातील अनेक वसाहतींना आठवड्यातून एकदाच तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे.

पाणीपट्टी कमी करण्याची मागणी

एकीकडे कमी पाणी मिळत असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र पाणीपट्टी पूर्णपणे वसूल करण्यात येत होती, 4 हजार 50 रुपये असलेली पाणीपट्टी कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, त्यानंत आता पालकमंत्री देसाई यांनी मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.

पाण्याचे समान वाटप झालेच पाहिजे

शहरातील पाणीपुरवठा संदर्भात विविध 42 मुद्यांवर स्मार्ट सिटी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीत अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्याभरात 15 एमएलडी पाणी शहरासाठी कसे वाढवण्यात याविषयीही माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांकडून शहरात पाण्याचे समान वाटप झालेच पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच खासगी विहिरी, बोअरवेल्स अधिगृहित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी समिती

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांचा समावेश राहणार असल्याची माहितीही सुभाष देसाई यांना देण्यात आली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें