Dhananjay Munde | पाच वर्षांपूर्वी निधी रोखायचा प्रयत्न केला होता, धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

| Updated on: Jul 15, 2022 | 6:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आज जल्लोषात सादरा झाला. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन परळीत करण्यात आलं होतं.

Dhananjay Munde | पाच वर्षांपूर्वी निधी रोखायचा प्रयत्न केला होता, धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परळीः महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुणीही असो. आपला निधी रोखला जाणार नाही. विकास कामांसाठीचा पैसा मतदारसंघात येणारच. पाच वर्षांपूर्वी आपला निधी रोखण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आता तो होऊ शकणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला. हे सांगतानाच त्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या भाजप सरकारमधील आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त परळी मतदार संघात त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थिती कार्यकर्ते आणि समर्थकांना उद्देशून त्यांनी भाषण केलं. राज्यातील सत्ता गेली तरीही परळीतील जनतेला सोयीसुविधा पुरवण्यासाठी विकास कामं यापुढेही होत राहतील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

परळी येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ परळी वैद्यनाथ या मतदार संघाचं कर्तृत्व एवढं मोठं करेल की महाराष्ट्रात किती राजकीय घडामोड होऊ देत. परळी मतदार संघाला विचारल्याशिवाय काहीही निर्णय होऊ शकणार नाही, एवढी आपण ताकद वाढवणार आहोत. सत्ता असो नसो विकासाला कुठलाही निधी कमी पडला नाही. पाच वर्षांपूर्वी इथल्या लोक प्रतिनिधींनी आपला निधी रोखायचा प्रयत्न केला. ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत होते. तरीही आपला निधी थांबवू शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कोण होतं, याच्याशी आपलं देणं घेणं नाही. आपला विकासाचा निधी कुणीही थांबवू शकत नाही, असं मी तुम्हाला वचन देतो…’

धनंजय मुंडेंचा वाढदिवस जल्लोषात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आज जल्लोषात सादरा झाला. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन परळीत करण्यात आलं होतं.

‘हार तुरे नकोय, फक्त एक झाड लावा’

धनंजय मुंडे यांचे समर्थक राज्यभरात पसरलेले आहेत. यंदाच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्या चाहत्यांना विनम्र आवाहन केलंय. यावर्षी बीड जिल्ह्यासह सर्वत्र चांगला पाऊस पडतोय. आपल्या भागात वृक्षारोपण होण्याची वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे. याचाच विचार करून आपण माझ्या वाढदिवसानिमित्त हार, तुरे, केक, बुके, बॅनर्स, फ्लेक्स आदी बाबींवरचा खर्च टाळून त्या ऐवजी किमान एक झाड लावून झाडाचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा,अशी साद धनंजय मुंडे आपल्या चाहत्यांना ट्विट करत घातली आहे.