दिवाळी दारात अन् सोनेही स्वस्त दरात, वाचा औरंगाबादचे भाव अन् आजचे Gold Gyaan! 

आज 02 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,400 रुपये प्रति तोळा एवढे आहेत. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही 67,500 रुपये  एवढे नोंदवले गेले.

दिवाळी दारात अन् सोनेही स्वस्त दरात, वाचा औरंगाबादचे भाव अन् आजचे Gold Gyaan! 
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 4:12 PM

औरंगाबादः दिवाळीचा सण तोंडावर असताना गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात स्थिरता (Gold price) दिसत आहे. दिवाळीत पन्नास हजार रुपयांवर सोन्याचा दर जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे (International Market) सोन्याच्या दरात ऑक्टोबरनंतर फार वाढ झालेली दिसून आली नाही. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशांतर्गत तसेच विविध शहरांच्या बाजारातही सोन्याच्या दरात अति वाढ दिसून आलेली नाही. औरंगाबादच्या सराफा (Aurangabad market) बाजारातदेखील हेच चित्र दिसून आले. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचाही मोठा उत्साह दिसून येत आहे.

औरंगाबादचे भाव काय?

आज 02 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,400 रुपये प्रति तोळा एवढे आहेत. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही 67,500 रुपये  एवढे नोंदवले गेले. 31 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले. 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले.

Gold Gyaan: दागिन्यांव्यतिरिक्त अन्य कुठे होतो सोन्याचा वापर?

Gold in medicine

विविध आजारांवरील उपचारांसाठी औषधींमध्ये सोन्याचा वापर केला जातो.

आज का ग्यानः   सोन्याचा वापर दागिने, आभूषणांसाठी मोठ्या प्रमाणावर होतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र सोन्याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये केला जातो. वेगवेगळे जोड, तारांचे जोड यात सोन्याचा वापर केला जातो. वैद्यकीय क्षेत्रातही सोन्याचा वापर होतो. सोडियम ऑर्थिओमलेट किंवा ऑर्थिओग्लुकोज ही अल्पप्रमाणात सोन्याचा अंश असलेली औषधी बनवण्यात आलेली आहेत. सोन्याची काही समसंयुगे काही प्रकारांच्या कर्करोग उपचारांसाठीही वापरली जातात. तसेच शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यातही सोन्याचा वापर केला जातो. सोन्याचा दात बसवण्याची प्रथा आजही आपल्याकडे प्रसिद्ध आहे. अंतराळ क्षेत्रातही सोन्याचा वापर होतो. तेथे उष्णतेचे नियमन करण्यासाठी सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरली जातात. त्यामुळे सोने हे मौल्यवान मानले जाते. आता तर देशविदेशांमध्ये 24 कॅरेट गोल्ड स्पाची थेरपीही प्रसिद्ध होत आहे.

इतर बातम्या-

Crime: बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड 

लेबर कॉलनी क्वार्टरवर दिवाळीनंतर बुलडोझर फिरणार, कारवाईच्या नोटिसीने रहिवासी धास्तावले, इम्तियाज यांची भेट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.