AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत टॅक्सीने बाहेरगावी जाणे महागले, औरंगाबादमधील ट्रॅव्हल्स, टुरिस्ट कारची 23 टक्क्यांनी भाडेवाढ

औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने इंधनातील दरवाढीमुळे 23 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये आरटीओ कार्यालयाने निश्चित केलेल्या दरापेक्षा भाडेवाढीनंतरचे दर हे कमी आहेत. इंधन दर 5 रुपयांनी वाढल्यानंतरही प्रति किमी फरकाची रक्कम वाढवण्याचा निर्णय असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

दिवाळीत टॅक्सीने बाहेरगावी जाणे महागले, औरंगाबादमधील ट्रॅव्हल्स, टुरिस्ट कारची 23 टक्क्यांनी भाडेवाढ
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 3:09 PM
Share

औरंगाबादः दिवाळीदरम्यान कुठे फिरायला किंवा टॅक्सीने बाहेरगावी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सध्याची दरवाढ एकदा तपासून घ्यावी लागेल. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे आता औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने (Aurangabad Tourism) टुरिस्ट कार, मिनी बस, ट्रॅव्हल्सची 23 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol And Diesel Price hike) कार भाड्याने देण्याचा व्यवसाय डबघाईला आला आहे. दर किलोमीटरमागे कार व्यावसायिक आकारत असलेले दर सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नाहीयेत. आता या दरात आणखी वाढ झाल्यावर पर्यटनावर याचा परिणाम होऊ शकतो.

रविवारी दरवाढीचा एकमताने निर्णय

दरवाढीसंदर्भात औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनची रविवारी बैठक पार पडली. असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, सचिन अनिल कहाळे, उपाध्यक्ष प्रवीण डेरे, कोषाध्यक्ष सचिन ठोळे, सदस्य ईश्वर सूर्यवंशी, सचिन पानगावकर, मदन जैस्वाल, प्रसन्न पाटील हे या बैठकीत उपस्थित होते. यावेळी इंधन दरवाढीवर चर्चा करून कार, मिनीबस, ट्रॅव्हल्स बसचे दर वाढवण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. सध्या प्रतिलीटर पाच रुपयांनी दरवाढीचा निर्णय़ घेण्यात आला. मात्र इंधनातील दरवाढ आमखी झाली तर प्रति किमी फरकाची रक्कमही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या वाहनासाठी किती भाडेवाढ?

  •  एसी आणि नॉन एसी कार वाहन प्रकारानुसार 12 रुपयांपासून 19 रुपयांपर्यंत प्रतिकिमी दर.
  • 13 आणि 17 आसनी एसी वाहनासाठी 26 रुपये, तर नॉन एसीसाठी 23 रुपये
  •  20 आसनी एसी वाहनासाठी 30 रुपये प्रतिकिमी दर राहील, नॉनएसीसाठी 27 रुपये
  •  25 आसनी एसी वाहनासाठी 33 आणि नॉन एसीसाठी 30 रुपये प्रतिकिमी दर राहील.
  •  25 आसनी एसी बससाठी 50 रुपये, नॉन एसीसाठी 35 रुपये प्रतिकिमी दर निश्चित करण्यात आले आहेत.

आरटीओच्या दरापेक्षा कमीच

औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने इंधनातील दरवाढीमुळे 23 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये आरटीओ कार्यालयाने निश्चित केलेल्या दरापेक्षा भाडेवाढीनंतरचे दर हे कमी आहेत. इंधन दर 5 रुपयांनी वाढल्यानंतरही प्रति किमी फरकाची रक्कम वाढवण्याचा निर्णय असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबाद टुरिझम अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.

इतर बातम्या-

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!

Weather: औरंगाबादचा पारा घसरतोय, आरोग्य सांभाळा, वाचा कधी होती सर्वाधिक थंडी?

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.