“पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न”, पाणी टंचाईवर जयंत पाटलांचा प्लॅन काय ?

| Updated on: Sep 26, 2021 | 9:15 PM

पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषेद बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न, पाणी टंचाईवर जयंत पाटलांचा प्लॅन काय ?
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्यात पाणी टंचाई हा अतिशय गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर मराठवाड्यातील जिल्ह्यांची स्थिती अत्यंत दयनीय अशी होते. यावर काहीतरी ठोस उपाय हवा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जाते. याच समस्येवर बोलताना पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषेद बोलत होते. (jayant patil on water shortage said trying to bring water of west maharashtra and nashik district river to marathwada)

पश्चिम महाराष्ट्र, नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात 

यावेळी बोलताना त्यांनी जायकवाडी धरण तसेच धरणाची पाणी साठवण्याची क्षमता यावर भाष्य केलं. “जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवणार आहोत. जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल,” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात गोदावरी नदीवर 782 नवे बंधारे उभारण्यात येणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या आगामी योजनेबद्दलही सांगितले.

भागवत कराड यांनी केंद्रातून निधी आणावा

जयंत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे निधीसाठी विनंती केली. “भागवत कराड यांना विनंती आहे की, नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रातून निधी आणावा. ते सध्या केंद्रात आहेत,” असे जयंत पाटील कराड यांना उद्देशून म्हणाले. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. यावर बोलताना जलसंपदा विभागाच्या भरतीबाबत वित्तविभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. जलसंपदा विभागाला लागणारे मनुष्यबळ अधिकाऱ्यांना लागेल तसे उपलब्ध करून घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय 

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना  स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्षात स्थानिक पातळीवर निर्णय होईल, असे पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

संजय राऊत यांचा बारामतीवर डोळा, म्हणतात ताकद वाढवली पाहिजे, पवारांचा गड भेदण्याची शिवसेनेची तयारी ?

VIDEO : संजय राऊतांची भरसभेत घोडे लावण्याची भाषा, एक्सपर्ट असल्याचंही वक्तव्य, नेमकं काय घडलं?

(jayant patil on water shortage said trying to bring water of west maharashtra and nashik district river to marathwada)